Soldier Sucide Case esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी संस्थाचालकांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : उच्च न्यायालयाच्या आदेशाने अनुकंपावर नोकरीला लागूनदेखील दहा लाख रुपये मागितले आणि अतिरिक्त ठरविल्याने तालुक्यातील शिरूड येथील शिपायाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी संस्थाचालकांसह ११ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार भाऊराव देवरे (रा. सारबेटा) २०१३ मध्ये ग्रामविकास शिक्षण मंडळ, मुडी या संस्थेच्या सारबेटा येथील सार्वजनिक विद्यालयात अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागले होते. २०१६ मध्ये तुषार देवरे यांची संस्थेच्या शिरूड येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूलमध्ये बदली करण्यात आली.

संस्थेतील कायम संचालक रमेश विनायक पाटील, सचिव सुनील पंढरीनाथ पाटील, प्रभारी अध्यक्ष पंजाबराव पांडुरंग पाटील, संचालक जयवंतराव अमृतराव पाटील, कमलाकर विनेश पाटील, दीपक चंदन पाटील, शालेय समिती सदस्य शशिकांत रघुनाथ पाटील यांनी दहा लाख रुपये देणगी मागितली. पैकी तुषारने ग.स. पतपेढीतून दोन लाख कर्ज काढून दिले, तरीही उर्वरित पैशांसाठी त्यांनी तगादा लावला आणि हेतुपुरस्सर अतिरिक्त केले.(Case against 11 Persons including director of institution in connection suicide of soldier Jalgaon Crime News)

कर्मचारी दिनेश वसंत पाटील व सचिन संजीव काटे, डॉ. शरद शिंदे व अनिल लोटन पाटील निवृत्त मुख्याध्यापक यांनी मानसिक त्रास दिला म्हणून तुषारने चोपडा रोडवरील उड्डाणपुलाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली होती.आत्महत्येपूर्वी तुषारने तीन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या.

तसेच दीपक पाटील, रमेश पाटील, जयवंतराव पाटील, कमलाकर पाटील, कर्मचारी दिनेश पाटील, अनिल पाटील, सचिन काटे, शालेय समिती सदस्य शशिकांत पाटील आत्महत्येस जबाबदार आहेत, असेही पत्र लिहून ठेवले होते.

माझ्या आत्महत्येस जबाबदार लोकांना सोडू नको, संस्थेची व संस्थेच्या शाखांची पूर्णपणे सखोल चौकशी व्हावी, बोगस मान्यता वगैरे या गोष्टींवर लक्ष द्यावे, संस्थेमध्ये काही लोकांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले आहेत, असा उल्लेख आहे. तुषारची पत्नी प्रतीक्षा हिच्या फिर्यादीवरून ११ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT