jalgaon latest crime news esakal
जळगाव

Crime Jalgaon : भवानी पेठेतील दुकान फोडून रोकड लंपास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील भवानी पेठ येथील सागर भवनजवळील दुकान फोडून दुकानातील ३८ हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास (Theft) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Cash stolen from smashed shop in Bhavani Pethe Jalgaon crime latest news)

शिरसोली रोड गायत्रीनगरात सुमित राजकुमार मंडोरे (वय ३२) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे भवानी पेठेत सुधा इंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी ७ वाजता दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील ड्रावरमध्ये ठेवलेले ३८ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याचे उघडकीला आले.

हा प्रकार शनिवारी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. त्यांनी शनीपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात दुपारी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT