Cotton Crop esakal
जळगाव

Agriculture News : कापसाचे दर मकरसंक्रांतीनंतर वाढीची शक्यता; जिनिंग चालक संपावर जाणार?

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरासह जिल्ह्यात सध्या कापसाचे प्रतिक्विंटल दर आठ ते साडेआठ हजार आहेत. ते मकरसंक्रांतीपर्यंत तसेच राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली. जिल्ह्यात कापसाची टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील केवळ ७५ जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू आहेत. निम्म्याच जिनिंग सुरू असल्याने रोजचा खर्चही निघणे अवघड आहे. यामुळे जिनिंग प्रेसिंग असोसिएशन पाच दिवसांच्या संपावर जाण्याच्या तयारीत आहे.

कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी कमी आहे. गाठीचे दरही कमी असल्याने व्यापारी कापसाला दहा हजारांचा भाव देऊ शकत नसल्याचे चित्र आहे. हे स्थिती मकरसंक्रांतीपर्यंत कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

बाजारपेठेत येणारा कापूस बंद झाल्याने कापसाअभावी जिनिंग व्यवसाय धोक्यात आला आहे. कापसाअभावी जिनिंग व्यवसायापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जिनिंग केवळ एकाच पाळीत सुरू आहे. यामुळे अपेक्षित गाठी तयार होत नाही. कारण कापूसच जिनिंगमध्ये येत नाही.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या गाठींना मागणी कमी झाली आहे. यंदा कापसाचे अधिक उत्पादन झाले आहे. यामुळे व्यापारी कापसाचा दर्जा पाहून आठ ते साडेआठ हजारांचा दर देत आहेत. कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळाला पाहिजे, त्याशिवाय कापूस बाजारात आणल्या जाणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांची आहे. कापसाची आवक कमी झाल्याने जिनिंग कापसाअभावी चालवायाच्या कशा, असा प्रश्‍न आहे.

जिनिंगमध्ये चारशे गाठी तयार होत असतील, तर त्यांना केवळ दोनशे गाठींचाच कापूस उपलब्ध होत आहे. दोनशे गाठी असूनही तयार करता येत नाहीत, अशीच स्थिती सर्व कारखान्यांची आहे. दरम्यान, चार ते पाच दिवसांचा संप केल्यानंतर अचानक कापसाची आवक वाढेल. यामुळे जिनिंग चालकांना जिनिंग चालविणे शक्य होणार आहे.

''जिल्ह्यासह राज्यात कापसाची आवक कमी झाली आहे. केवळ २० ते २५ हजार गाठींचा कापूस येत आहे. जिनिंग चालविणे शक्य नाही. यामुळे जिनिंग असोसिएशन चार ते पाच दिवसांच्या संपावर जाण्याच्या तयारीत आहे. लवकरच संप पुकारला जाईल.'' -हरीश अग्रवाल, संचालक, खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल ओनर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT