jalgaon Theft news  sakal
जळगाव

जळगाव : नाट्यगृहाचे लाखोंचे साहित्य चोरीला

निकम यांची मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : नगरपालिकेच्या मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहातून सुमारे पंधरा ते सोळा लाखाचे साहित्य चोरीस गेले असून, गेल्या बारा दिवसांपासून चोरी उघडकीस येऊन देखील पालिकेच्या प्रशासकांना माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत अद्याप पोलिसात तक्रार दाखल न झाल्याने उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे, की नाट्यगृहातील साडेसोळा लाख रुपयांचे साऊंड सिस्टिम आणि कॉलर माईक, मिक्सर असे साहित्य चोरी गेल्याचे निदर्शनास आले असून, अद्याप एफआयआर का दाखल करण्यात आली नाही. याबाबत विचारणा केली आहे. १२ जानेवारीला ही बाब उघडकीस आली. वीज विभागाचे अभियंता प्रशांत ठाकूर यांनी प्राथमिक पाहणी केली. त्यावेळी इलेक्ट्रिक ठेकेदाराने साधारणतः पंधरा लाख रुपयांची चोरी झाल्याचे सांगितले.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या चोरीबाबत खल सुरू असून, चौकशी सुरू आहे. नाट्यगृह गेल्या काही महिन्यांपासून एका संस्थेला करारावर देण्यात आले आहे. नाट्यगृहाचा ताबा त्या संस्थेकडे आहे.

तर नाट्यगृहाच्या स्टोअर रूमची चावी ठेकेदाराकडे व दुसरी स्थानिक ठेकेदारांच्या वॉचमनकडे होती. नेमकी चोरी कुणी केली, याबाबत पालिका देखील संभ्रमात पडली आहे. स्थानिक ठेकेदाराचे बिल अद्याप बाकी असल्याचे समजते. तरी नाट्यगृह कराराने कसे देण्यात आले, याबद्दल चर्चा सुरू आहे.

''नाट्यगृहाच्या चोरीची माहिती नाही. याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य ती पावले उचलली जातील.''

- सीमा अहिरे, प्रशासक, नगरपालिका, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT