death  esakal
जळगाव

भरधाव ट्रॅक्टर उलटून मुलाचा जागीच मृत्यू

शेतात नांगरणी करताना ट्रॅक्टर नाल्यात उलटून त्या खाली दबल्यामुळे एका पंधरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव) : शेतात नांगरणी करताना ट्रॅक्टर नाल्यात उलटून त्या खाली दबल्यामुळे एका पंधरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना विश्राम जिन्सी (ता. रावेर) येथे रविवारी (ता. २९) घडली. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्राम जिन्सी येथील हरदास शंकर राठोड यांच्या गट क्रमांक १६ मधील शेतात रविवारी (ता. २९) दलसिंग ग्यारसिंग मिलाला (वय १५) (रा. मुसापुरी, ता. भगवानपुरा, मध्य प्रदेश) हा भरधाव ट्रॅक्टर चालवून नांगरणी करीत असताना शेताजवळील नाल्यात लाल रंगाचे महिंद्रा युवो ५७५ डीआय कंपनीचे ट्रॅक्टर उलटून यात चालक दलसिंग ग्यारसिंग मिलाला (वय १५) हा ट्रॅक्टरखाली दबला जाऊन काना-नाकातून रक्तस्त्राव होऊन गंभीर जखमी झाल्यामुळे जागीच ठार झाला. याबाबत शेतमालक हरदास राठोड यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरिक्षक विशाल सोनवणे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested : 'कॅप्टन' खरातचा घाणेरडा चेहरा उघड; महिलांच्या लैंगिक शोषणाचे 58 व्हिडिओ पोलिसांच्या हाती, राजकीय वर्तुळात खळबळ

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT