Japanese Encephalities esakal
जळगाव

Jalgaon News : मेंदूज्वराने ग्रस्त बालकाला मृत्यूच्या दाढेतून काढले; डॉ पाटील रुग्णालयातील टीमचे यश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मेंदूज्वराने ग्रस्त सहावर्षीय बालकावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगतज्ज्ञांसह टीमने वेळीच उपचार करून या बालकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. (child suffering from Encephalitis was saved by doctor from Dr Patil Hospital jalgaon news)

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. उमाकांत अणेकर यांनी याबाबत सांगितले, की अशा प्रकारची ही पहिलीच केस पाहण्यात आली. बालकाला आणले तेव्हा तो बेशुद्ध होता. त्याला झटके येत होते, तापही होता. तसेच इंट्राक्रेनियल हायपरटेंशन अर्थात मेंदूवराची सूज होती. त्यातून बालकाचे सर्व अवयव निकामी होण्याच्या मार्गावर होते.

बालरोग विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. अणेकर, निओनेटोलॉजिस्ट डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. विक्रांत देशमुख, डॉ. गौरव पाटेकर, निवासी डॉ. सुरुची शुक्ला, डॉ. चंदाराणी या टीमने जिद्दीने प्रयत्न करून बालकावर प्रभावी उपचार केल्यानंतर बालक उठून बसायला लागला, जेवण करू लागला.

एमआरआय केला असता, बालकाच्या मेंदूवर सूज असल्याचे निर्दशनास आले, त्यावरही औषधोपचार केले. इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळेच मुलगा वाचू शकला, अशी प्रतिक्रिया रुग्ण बालकाच्या आईने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Abitkar : पालकमंत्री पहिल्यांदा एवढे चिडले, कोल्हापूर महापालिकेच्या कारभारावर सगळ्याचं अधिकाऱ्यांना चांगलाच धुतला; काय घडलं नेमकं?

Kolhapur Politics : सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यात जुंपली, मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार?

Vijay Deverakonda Net Worth: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? किती आहे संपत्ती?

मोठी बातमी : भारतात 'चिकन' खाऊन आजारी पडले क्रिकेटपटू; एकाला तातडीने दाखल करावे लागले हॉस्पिटलमध्ये

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वादात; 'क्लब टेंडरिंग'ची चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT