Doctor Sakal
जळगाव

वाहनचालकांची मुले होणार डॉक्टर... शाबास!

पथारेचा नावलौकिक उंचावला; दोंडाईचासह पंचक्रोशीतून सत्कारांद्वारे शुभेच्छांचा वर्षाव

सकाळ वृत्तसेवा

धुळे : पथारे (रामी, ता. शिंदखेडा) येथील कालिपिली टॅक्सी, ट्रक चालकाच्या मुलांनी शासकीय वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला आहे. प्रतिकूल परिस्थितीत नीट परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी एमबीबीएसच्या प्रवेशाचे स्वप्न साकार केले आहे. त्यांचे उत्तुंग यश इतर विद्यार्थ्यांसाठी अनुकरणीय आहे. पथारेतील मुले डॉक्टर होणार या कल्पनेने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या मुलांना सर्व शाब्बासकीची थाप दिली जात आहे.

मुलांना प्रोत्साहन देत संजय जाधव आणि प्रकाश जाधव भावंडांनीही पालकांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या कुटुंबातील मुलांनी नीट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत खुल्या प्रवर्गातून एमबीबीएससाठी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला आहे. तसेच आता मनीष प्रकाश जाधव याने नीट परीक्षेत ६०३ गुण मिळवत, तर त्याचा भाऊ केतन संजय जाधव यानेही नीट परीक्षा उत्तीर्ण होत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित केला. त्यांच्या या यशामुळे पथारेचा नावलौकिक वाढला आहे. त्यांचा दोंडाईचा परिसरातील संघटना, संस्था, मान्यवरांकडून सत्कार होत आहे.

मनीष आणि केतनची घरची स्थिती हलाखीची असून मनीषचे वडील ट्रक, तर केतनचे वडील कालिपिली जीप चालवितात. अशा कष्टप्रद स्थितीतून त्यांनी मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. कोरोना महामारीत कित्येकांचे व्यवसाय ठप्प झाले. त्यात प्रकाश जीपद्वारे चरितार्थ भागवत होते. आर्थिक काटकसरीतून त्यांनी मुलांकडे विशेष लक्ष देत भविष्य उज्ज्वलतेसाठी प्रयत्न केले. मुलेच आपले आयुष्य बदलू शकतात, असा त्यांना ठाम आत्मविश्वास संजय आणि प्रकाश या जाधव भावंडांना आहे. मुलांचे कौतुक होताना पाहून पालक आनंदाश्रूत हरखले आहेत. मनीष व केतनचे दहावीपर्यंत शिक्षण दोंडाईचात रोटरी स्कूलमध्ये झाले.

आजोबा असते तर...

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत या मुलांचे आजोबा दरबारसिंग लोटन जाधव ऊर्फ दरबार पहेलवान यांचे निधन झाले‌. या घटनेमुळे जाधव कुटुंबाचा मार्गदर्शक व भक्कम आधारवड निखळला. दुःख सावरत मनीष व केतनने ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले. आजोबांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेत स्वप्नपूर्ती केली. आज आजोबा असते तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असता, त्यांना नातवांचे भूषण वाटले असते, अशी भावना जाधव परिवाराने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT