Bail denied Latest Marathi news esakal
जळगाव

चिन्या जगताप हत्याकांड : न्यायालयाने संशयीताचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्‍हा कारागृहात बंदिवान असलेल्या रवींद्र ऊर्फ चिन्या जगताप हत्याकांडातील संशयित तुरूंग अधीक्षक पेट्रस गायकवाड याचा जामीन न्यायालयाने फेटाळला.

जामीन फेटाळल्याची खात्री झाल्यानंतर गायकवाड यांनी तडकाफडकी नगर जिल्‍हाही सोडल्याचे सांगण्यात येत आहे. (Chinya Jagtap murder case Court rejects suspects bail Jalgaon crime Latest marathi news)

तत्कालीन तुरूंग अधीक्षक पेट्रस गायकवाडसह जेल सर्कल जितेंद्र माळी आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत ११ सप्टेंबर २०२० ला जळगाव जिल्हा कारागृहात बंदिवान चिन्या ऊर्फ रवींद्र जगताप याचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर चिन्या जगतापची पत्नी मीना जगताप यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर तत्कालीन जेलर पेट्रस गायकवाडसह पाच संशयितांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला.

अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर तत्कालीन तुरूंग अधीक्षक पेट्रस गायकवाड याची नगरच्या कारागृहात बदली झाली होती.

विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड याला अटक न झाल्याने कारागृह प्रशासन, वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस दलाच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. आता न्यायालयाने नियमित जामीन फेटाळल्याने पेट्रस गायकवाड यांनी नगरमधून धूम ठोकल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

सोनी BBC अर्थने धर्मेश बरई यांचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव केला

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT