Crime Latest Marathi News esakal
जळगाव

चिन्या जगताप हत्याकांड : खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांची पळापळ थांबता थांबेना

चिन्या जगताप हत्याकांडाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी तथा कारागृह रक्षक दत्ता खोत याच्या जामिनाची विशेष परवानगी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्याच्या कारागृह प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या जळगाव जिल्हा कारागृहातील चिन्या जगताप हत्याकांडाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी तथा कारागृह रक्षक दत्ता खोत याच्या जामिनाची विशेष परवानगी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २) फेटाळली आहे. (Latest Marathi News)

जळगावच्या कारागृहातील तत्कालीन कारागृह रक्षक दत्ता खोत या गुन्ह्यातील पाच संशयितांपैकी एक आहे. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर खोत यांच्याच वतीने सर्वात प्रथम जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. अटकपूर्व जामिनाला मयताची पत्नी व मूळ फिर्यादी पक्षातर्फे आक्षेप घेण्यात आला होता. मयत चिन्या जगताप याच्या शरीरावरील जखमा त्याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा शवविच्छेदन अहवाल विचारात घेऊन जिल्हा न्यायालयाने त्याचा हा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.

खंडपीठाने त्याला अंतरिम अटकपूर्व जामिन मंजूर केल्यावर अन्य चार आरोपींनीही त्याचा संदर्भ देत जिल्हा न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला होता. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाने खोत याचा मूळ अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दत्ता खोत याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. खंडपीठाचा निर्णय मान्य नसल्याने सर्वोच्च न्यायालयात धडकत जामिनासाठी विशेष परवानगी मिळावी म्हणून याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणीनंतर सरन्यायाधीश एम. व्ही. रमणा, न्या कृष्ण मुरारी व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे.

इतर संशयितांचा हिरमोड

या गुन्ह्यात तत्कालीन कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलिस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील असे चार संशयित असून चौघांचा जामिनासाठी प्रयत्न सुरु आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयातूनही कारागृह रक्षक खोत यास दिलासा मिळाला नसल्याने उर्वरित संशयितांचे धाबे दणाणले आहे. तर, मुख्य संशयित तत्कालीन कारागृह अधीक्षक आणि सद्या अहमदनगर कारागृहात नेमणुकीला असलेल्या पीटर्स गायकवाड भूमिगत झाल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Narwekar statement : अलिबाग येथे शेतकऱ्यांमधील वादाच्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा खुलासा

Maha Shivratri 2026 Song: नमो नमो शंकरा! कोट्यावधी चाहत्यांनी पाहिलं; तरीही पुन्हा ऐकावं वाटणारं भक्तिगीत

Latest Marathi News Live Update : सोलापूरच्या मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी

Maratha History : कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी पाकिस्तानच्या कराचीत कशी? मराठ्यांचा हा धगधगता इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा

Nashik : त्र्यंबकेश्वरला जाताना भाजप खासदाराच्या कारला आग, काही क्षणात कार जळून खाक

SCROLL FOR NEXT