crime  esakal
जळगाव

Jalgaon News : बालिकेसह तिच्या पित्यावर चॉपर हल्ला

औद्योगीक वसाहत परिसराला लागून असलेल्या सुप्रिम कॉलनी भागात जुन्या वादातून दहा वर्षाच्या बालिकेसह तिच्या पित्यावर घरात घुसून चॉपरने हल्ला करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : औद्योगीक वसाहत परिसराला लागून असलेल्या सुप्रिम कॉलनी भागात जुन्या वादातून दहा वर्षाच्या बालिकेसह तिच्या पित्यावर घरात घुसून चॉपरने हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवार (ता.३०) रोजी भरदुपारी घडली.

जखमींना तातडीने परिसरातील नागरीकांनी जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Chopper attack on girl with her father in jalgaon news)

सुप्रिम कॉलनीतील मच्छी मार्केट येथे कैलास उखा पवार (वय ३२) पत्नी व मुलांसह वास्तव्याला आहे. मिळेल ते, मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच परिसरात राहणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तीन ते चार भामट्यांनी कैलास पवार यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चॉपर हल्ला केला.

यावेळी कैलास पवार यांची मुलगी तेजस्विनी कैलास पवार (वय १०) ही देखील घरातच असल्याने चौघांनी तिच्या हातावर देखील चॉपर हल्ला करून जखमी केले. या हल्ल्यात कैलास पवार आणि तेजस्विनी पवार हे जखमी झाले. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.

पित्यासाठी..जीव धोक्यात

घरात घुसून आपल्या वडिलांवर चॉपरने सपासप वार करून त्यांना मारहाण होत असताना दहा वर्षीय चिमुरडी तेजस्विनी न घाबरता पित्याचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होती. तिने हल्लेखोरांचा प्रतिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, निर्दयी हल्लेखोरांनी तिलाही लक्ष केले.

जिल्‍हा रुग्णालयात हल्ल्याचा प्रयत्न

चौघांच्या हल्ल्यात जखमी पिता कैलास आणि मुलगी तेजस्विनी यांना जिल्‍हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या दोघा पिता-पुत्रीला ठार मारण्याच्या उद्देशाने पुन्हा तेच हल्लेखोर जिल्‍हा रुग्णालयात हल्ला करण्यासाठी आले होते. मात्र, रुग्णालय आवारात परिसरातील रहिवासी आणि नातेवाइकांची गर्दी वाढल्याने या हल्लेखोरांना संधी मिळण्याआधीच त्याची ओळख पटल्याने चौघांनी रुग्णालयातून पळ काढल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vehicle Insurance Expiry : गाडीचा इन्शुरन्स संपलाय, टोल नाका ओलांडताच दहा हजारांच्या दंडाचा येणार मेसेज; काय आहे नवीन नियम ?

Gokul Milk Rate : मुंबई-पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत दूध महागणार; 'गोकुळ'च्या दरात प्रति लिटर 2 ते 4 रुपयांची वाढ निश्चित, दरवाढीचा निर्णय शनिवारी शक्य

IND vs NZ, 1st Test: तो OUT होता... DRS मध्ये फिलिप्सला नाबाद दिल्यानं शुभमन गिलचा चढला पारा; अंपायरशीही वाद

Kolhapur KMT Ticket Hike : कोल्हापूरकरांच्या खिशाला कात्री! केएमटीचा प्रवास महागणार; तिकिटाचे दर 'इतक्या' रुपयांनी वाढणार?

Amravati News: विहिरीच्या खोदकामावेळी काळाचा घाला ;थडीवरील दगड डोक्यावर कोसळल्याने मजुराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT