crime news  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : तो चॉपर हल्ला लग्न मोडण्याच्या वादातून..

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील टॉवर चौकात सोमवारी (ता. ३) रात्री विक्की सांडू यादव (वय २७, रा. ब्राह्मणसभा, बळीराम पेठ) या तरुणावर धारदार चॉपरने हल्ला चढवून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. (Chopper attack over marriage break up dispute in jalgaon crime news)

जखमी तरुणासोबत लग्न ठरलेल्या मुलीशी प्रेमसंबंध असलेल्या तरुणाने त्याच्या मित्रांच्या संगतीने हा हल्ला चढविल्याचे समोर आले असून, शहर पोलिसांत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील बळीराम पेठेतील गवळी वाड्यातील रहिवासी दीपक लक्ष्मण गवळी (वय ३४) यांचा शालक विक्की यादव (मुळ रा. छत्रपती संभाजीनगर) याचे काही दिवसांपूर्वी शहरातील एका मुलीसोबत साखरपुडा होऊन लग्न ठरले होते.त्या मुलीसोबत गोलू मराठे याच्यासोबतचे फोटो विकी यादवच्या मोबाईलवर आल्यानंतर साखरपुडा मोडण्यात आला होता.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

परिणामी, गोलू मराठे याने विक्की यादव याला धमकावून त्रास देत होता. रविवारी (ता. २) मध्यरात्री गोलू मराठे, विवेक किशोर मराठे, भरात विवेक मराठे यांनी विक्की यादव यास फोन करून छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ बोलावून घेतले. नंतर तेथे वाद झाल्यानंतर भरत मराठे याने विक्कीच्या पोटात चॉपर खुपसला.

यात विक्की गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राथमिक उपचार करून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत दीपक गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT