Bribe esakal
जळगाव

लाच स्वीकारताना कारकुनाला दुसऱ्यांदा पकडले

या घटनेमुळे ‘तहसील’सह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

यावल (जि. जळगाव) : येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून मुक्तार फकिरा तडवी (एम. एफ. तडवी) याला पाचशे रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पकडण्यात आले. ही घटना बुधवारी (ता. १५) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे ‘तहसील’सह तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तडवीची लाच स्वीकारण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही त्याने लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे.

तक्रारदाराच्या वडिलांची मोहराळे शिवारात शेतजमीन असून, त्या शेतजमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराबाबत वाद-विवाद होते. त्यामुळे याबाबत येथील तहसीलदारांकडे दावा दाखल केला गेला होता. या दाखल केलेल्या दाव्यामधील तहसीलदारांनी दिलेल्या निकालाच्या दस्तऐवजांच्या नकला देण्याच्या मोबदल्यात शासकीय शुल्काव्यतिरिक्त तक्रारदाराकडे एम. एफ. तडवी यांनी पंचांसमक्ष स्वतःसाठी ५०० रुपये लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम श्री. तडवी यांनी स्वतः पंचांसमक्ष तहसील कार्यालयात स्वीकारली म्हणून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पर्यवेक्षण अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक एस. के. बच्छाव तपास अधिकारी असून, उपविभागीय पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलिस कर्मचारी अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांच्या पथकाने सापळा लावून ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतूक पोलिसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ! ‘एसीपी’ म्हणाले, वाहतूक पोलिसांना दिले जाणार चांगले वागण्याचे धडे; सहायक पोलिस आयुक्तांची झाली आदलाबदली

Ragi Ghavan: ग्लूटेन-फ्री नाश्ता हवाय? मग ही नाचणीच्या घावणाची रेसिपी नक्की ट्राय करा

Horoscope: पैशांच्या बाबतीत नशीबवान असतात ‘या’ 5 राशी; कमाईसोबत पैसा टिकवण्यातही पुढे!

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

SCROLL FOR NEXT