Gambling  esakal
जळगाव

Jalgaon : नगरदेवळ्यातील बंद सुतगिरणी बनली जुगाराचा अड्डा

आनन शिंपी

कजगाव (जि. जळगाव) : नगरदेवळा स्टेशन (ता. भडगाव) येथील बंद असलेल्या सुतगिरणीच्या (Cotton Mill) खोल्यांमध्ये राजरोसपणे जुगार (Gambling) सुरु असल्याने ही बंद सुतगिरणी जुगाराचा अड्डा (Gambling Den) बनली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आजूबाजूच्या रहिवाशांमधून होत आहे. (Closed cotton mill in Nagar Deola became gambling den Jalgaon crime news)

नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळील सहकारी सुतगिरणी ही बऱ्याच वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्याचा फायदा काही जुगारींनी घेत, येथील बंद खोल्यांचे दरवाजे उघडून अक्षरशः जुगाराचा अड्डा सुरु केला आहे. या ठिकाणी आजूबाजूच्या खेड्यांसह जवळच्या तालुक्यांमधील जुगारी खास खेळण्यासाठी येत असतात. दररोज लाखोंची उलाढाल या जुगार अड्‍ड्यांवर होत असते. सध्या ही सुतगिरणी जिल्हा सहाय्यक निबंधकांच्या ताब्यात असून या ठिकाणी एक सुरक्षा रक्षकही नेमलेला आहे. असे असतानाही येथे सर्रासपणे जुगाराचा अड्डा सुरु असतो. या जुगार अड्ड्यांमुळे आजूबाजूच्या वस्तीतील अनेक तरुण मुले त्याच्या आहारी गेली आहेत.

प्राप्त माहितीनुसार, येथील जुगार अड्डा चालवणाऱ्यांनी वॉचमनशी आर्थिक हितसंबंध जोपासले आहेत. त्यामुळे याबाबत तक्रार करुनही कुठलीच कारवाई केली जात नसल्याचा अनुभव रहिवाशांना आलेला आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधकांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन सुतगिरणीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या संदर्भात पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर यांना विचारणा केली असता, आमच्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन जुगार अड्डा सुरु असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT