स्टार्टअप
स्टार्टअप sakal
जळगाव

जळगाव : जिल्ह्यातील १०८ युवकांकडून ‘स्टार्टअप’

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बेरोजगारांना रोजगार मिळावा, या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजना २०१९-२० पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत या योजनेतून १०८ यवुक, युवतींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यापोटी त्यांना सात कोटी १२ लाखांची सबसिडी देण्यात आल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली.

शासनाने शहरी व ग्रामीण सुशिक्षित युवक-युवतींना विविध क्षेत्रांत उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम या नावाने महत्त्वाकांक्षी योजना २०१९-२० पासून राज्यात सुरू केली. जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. ही योजना पात्र असणारे उत्पादन व सेवा उद्योग व्यवसायांसाठी आहे. योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी, ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण अधिकतम मर्यादा ४५ वर्ष (अनुसूचित जाती/जमाती/महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी पाच वर्ष शिथिल) पात्र राहतील. योजनेसाठी शैक्षणिक पात्रता दहा लाखांवरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण, २५ लाखांवरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण अशी आहे. अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

हे उद्योग करता येऊ शकतात

योजनेत अर्जदारांना उत्पादन व्यवसायासाठी (बेकरी उत्पादन, पशुखाद्यनिर्मिती, फॅब्रिकेशन) ५० लाखपर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल. सेवा उद्योग व्यवसायासाठी (सलून, रिपेअरिंग व्यवसाय, ब्यूटिपार्लर) दहा लाखांपर्यंत अर्ज करता येईल. या योजनेत अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदारा शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किमतीच्या २५ टक्के अनुदान व ग्रामीण भागासाठी ३५ टक्के अनुदानासाठी पात्र असेल. त्यासाठी त्यांना स्वगुंतवणूक पाच टक्के करावी लागेल. उर्वरित सर्व प्रवर्गातील अर्जदार हा शहरी भागासाठी १५ टक्के, ग्रामीण भागासाठी २५ टक्के अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थ्यांना १० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने maha-cmegp.gov.in वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करावा.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करावयाचा आहे त्यांनी वरील वेबसाइटवर अर्ज करावा किंवा योजनेबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजसमोर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६, जळगाव (०२५७-२२५२८३२) येथे भेट द्यावी.

-चेतन पाटील,महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT