Collector Ayush Prasad giving a gift to a householder in Parola. esakal
जळगाव

Jalgaon News : कलेक्टर ऑफिस मध्ये आलेल्या आजोबांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले व्यसनमुक्त, नेमकं काय घडलं ?

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या पारोळा तालुक्यातील एका नागरिकाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बिडी सोडण्यासाठी समुपदेशन करीत त्याची बिडी सोडविली.

त्याला व्यसनमुक्त करीत नागरिकांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचा संदेश आपल्या समुपदेशनाच्या कृतीतून दिला. (Collector ayush prasad made one person free from addiction jalgaon news)

जिल्हाधिकारी प्रसाद दुपारी कार्यालयात येत असताना त्यांना पारोळा येथील एक गृहस्थ दिसले. त्यांनी त्यांना विचारले माझ्याकडे काही काम आहे का? तो नाही म्हटला. त्यावर ते म्हणाले बाबा तुम्ही व्यसन करता का? यावर तो गृहस्थ हो बोलला.

जेवण झाल्यावर मी बिडी ओढतो, असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या गृहस्थाचे व्यसन न करण्यासाठी समुपदेशन केले. श्री.प्रसाद यांनी जिल्हा उपआरोग्य अधिकारी यांना जेवणनंतर बिडी ऐवजी काय घेतले तरबिडी सुटेल असे विचारले.

त्यांनी जेवणानंतर बिडी पिणे सोडण्यासाठी शोप चघळणे चांगला उपाय आहे, असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी शिपायाकडून दहा रुपयांची शोप मागवून त्या गृहस्थाला दिली आणि बिडी पिणे सोडा असे सांगत, ती पिणे आरोग्याला घातक आहे, असे बजावले.

त्यावर गृहस्थाने आता यापुढे व्यसन करणार नसल्याचे स्पष्ट केले. नंतर तो गृहस्थ खासदार उन्मेष पाटील यांनाही भेटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT