jalgaon sakal
जळगाव

आ. डॉ. संजय कुटे यांचे उपोषण पंधरा दिवसांसाठी स्थगित

शासनाने विनंती केल्याने उपोषण केले स्थगित

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मतदारसंघातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा गत वर्षातील ६५ कोटी रुपये पीक विमा शासन आणि पीक विमा कंपनीच्या भांडणांमध्ये अडकून पडला आहे. वारंवार निवेदने देऊन आंदोलने करून कृषी मंत्री सचिव विमा कंपनी यांच्याशी चर्चा करून सुद्धा हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे शेतकरी फार हवालदिल झाला आहे. पूर्ण आठ महिने उलटूनही त्यांच्या हाती ना पीक विमा पडला ना कोणतीही आर्थिक मदत पडली.

त्‍यामुळे आ. डॉ. संजय कुटे यांनी १६ सप्टेंबरपासून मंत्रालयात आंदोलन सुरू केले होते. शासनाने विमा कंपनीशी चर्चा करण्यासाठी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी पंधरा दिवसाचा अवधी मागितला असून, शासनाच्या विनंतीला मान देऊन आ. डॉ. संजय कुटे यांनी आपले उपोषण पंधरा दिवसांसाठी स्थगित केले.

मला शेतकऱ्यांनी त्‍यांचा प्रतिनिधी म्‍हणून विधानसभेत पाठविले. त्यांच्या हक्कासाठी लढणे हे आपले कर्तव्य आहे. सात-आठ महिने सर्व शेतकरी थांबले, आपण पण थांबलो. अजून पंधरा दिवस थांबायला काही हरकत नाही.

हे पंधरा दिवस शासन व विमा कंपनीचे असतील, मात्र सोळावा दिवस हा आपला असेल, म्हणून शेतकऱ्यांचा जास्त अंत शासनाने न पाहता या १५ दिवसाच्या आत हा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा सोळाव्या दिवशी आपण याच ठिकाणी आंदोलन उभारू आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असे यावेळी आ. डॉ. संजय कुटे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव सरिता चांदेकर-देशमुख यांनी यावेळी आ. डॉ. संजय कुटे यांची भेट घेऊन शासनाच्या वतीने केलेल्या विनंतीवरून पंधरा दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचे आ. डॉ. कुटे यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT