cottan sakal
जळगाव

Jalgaon CCI Center : कापूस महामंडळातर्फे हमीभावात खरेदीचा प्रारंभ; जळगाव शहरात पहिले केंद्र

भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)तर्फे जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदीस प्रारंभ झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon CCI Center : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)तर्फे जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदीस प्रारंभ झाला आहे.

पहिले केंद्र शिवाजीनगरातील महावीर जिनिंगमध्ये सुरू करण्यात आले असून, सात हजार वीस रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला आहे.(Commencement of purchase at guaranteed price by Cotton Corporation jalgaon cci center news)

कापूस मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आतापर्यंत केवळ खासगी व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करण्यात येती होती. भारतीय कापूस महामंडळातर्फे खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र कापसाला हमीभावही चांगला देण्याची मागणी करण्यात आली होती.

कापूस महामंडळातर्फे जळगाव जिल्ह्यात खरेदी सुरू करण्यात आली आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत खरेदी सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगरातील महावीर जिनिंग ॲन्ड प्रेसिंग येथे बुधवारी (ता. २०) पहिले केंद्र म्हणून प्रारंभ करण्यात आला आहे.

या वेळी बाजार समितीचे सभापती श्यामकांत सोनवणे, तसेच संचालक सुनील महाजन, दिलीप कोळी, संदीप पाटील, हर्षल नारखेडे व सी.सी.आय.चे केंद्रप्रमुख मिणा व बाजार समितीचे सचिव प्रमोद काळे, सुपरव्हायझर विकास सूर्यवंशी उपस्थित होते.

सात हजार वीस रुपये हमीभाव

कापूस खरेदीच्या प्रारंभालाच शेतकऱ्यांना सात हजार वीस रुपये हमीभाव देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कापूस आणताना या वर्षी पेरा केलेला सातबाराचा उतारा, आधारकार्डची अपडेट छायाकिंत प्रत व राष्ट्रीयीकृत बँक पासबुकाची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, तसेच आपला कापूस सुकवून व स्वच्छ करून कापूस खरेदी केंद्रावर आणावा, असे आवाहनही बाजार समितीच्या सभापतींनी केले आहे.

प्रतिसाद मिळाल्यास केंद्र वाढविणार

जळगाव जिल्ह्यात पहिले केंद्र सुरू होत आहे. शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रास चांगला प्रतिसाद दिला व खरेदी केंद्रांची मागणी आल्यास, आणखी खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT