Bapu Mahajan Receiving felicitation by Nagpalika Chief Officer Jyoti Bhagat Patil esakal
जळगाव

पारोळ्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी स्पर्धा यशस्वी

मिलिंद वानखेडे

पारोळा (जि. जळगाव) : येथील नगरसेवक बापू महाजन यांनी उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी ‘एक वाटी कडधान्य आणि एक ताटात पाणी’, अशी स्पर्धा (Competition) घेतली होती. या स्पर्धेत शहरातील अनेक नागरिकांनी सहभाग घेत पक्ष्यांविषयी भूतदया दाखविली. त्याचा नुकताच निकाल (Result) जाहीर होऊन विजेत्यांना खासदार उमेश पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. (Competition successful for thirsty birds in Parola Jalgaon News)

नगरसेवक बापू महाजन यांनी पक्ष्यांसाठी एक अनोखी स्पर्धा राबून ‘माझी वसुंधरा’ यात पर्यावरण व वृक्षांविषयी जिव्हाळा दाखविल्याने त्यांच्या नगरपालिकेतर्फे प्रशासक तथा मुख्याधिकारी ज्योती भगत- पाटील यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. कार्यालयीन अधीक्षक संघमित्रा संदानशिव, नगरसेवक मनीष पाटील, नगरसेवक पी. जी. पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

दरम्यान, सिडबॉल्स कॅम्पेन ग्रुपचे राहुल निकम यांचाही सन्मान पालिकेतर्फे झाला. लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांच्या मार्गदर्शनातून बापू महाजन यांचे सामाजिक योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण असते, असे गौरवोद्गार नगरसेवक पी. जी. पाटील यांनी व्यक्त केले. नगरसेवक मनीष पाटील यांनी बापू महाजन, राहुल निकम यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT