SYSTEM
जळगाव

नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करा : खासदार रक्षा खडसे

मंगळवारी (ता.३१) सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे २४७ हेक्टर क्षेत्रावर सुमारे साडेनऊ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ वृत्तसेवा

यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील शेतकऱ्यांची संकटाची मालिका थांबता थांबेना. तालुक्यात मंगळवारी (ता.३१) सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे २४७ हेक्टर क्षेत्रावर सुमारे साडेनऊ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित नुकसानग्रस्त गावांतील पंचनामे युद्धपातळीवर सुरू झाले आहेत.

दरम्यान, तालुक्यात नुकसान झालेल्या यावल, चुंचाळे, मोहराळे, सौखेडासीम, चिंचोली, हिंगोणा, किनगाव, बोरखेडा आदी गावांना खासदार रक्षा खडसे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी आज भेटी देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांचे सांत्वन केले. शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीला नुकसान झाल्याबाबत कळविण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच महसूल व कृषी विभागाने पंचनाम्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना देखील त्यांनी केल्या.

तालुक्यात यावल, भालोद, फैजपूर, साकळी व किनगाव या पाच महसूल मंडळात ३३ गावांत ३०४ शेतकऱ्यांचे २४७ हेक्‍टर क्षेत्रावर केळी पिकाचे सुमारे साडेनऊ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे बहुतेक शेतकरी हतबल झाले आहेत. यात सर्वाधिक नुकसान साकळी महसूल मंडळात नऊ गावांचे ८४ शेतकऱ्यांचे ७६ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. त्या खालोखाल किनगाव महसूल मंडळात नऊ गावांमध्ये ६३ शेतकऱ्यांचे ५४ हेक्टर क्षेत्रात, यावल महसूल मंडळात सहा गावांमध्ये ५९ शेतकऱ्यांचे ४६ हेक्टर क्षेत्रात, फैजपूर महसूल मंडळात ६ गावात ४६ शेतकऱ्यांचे २८.५० हेक्‍टर क्षेत्रात, तर भालोद महसूल मंडळात ३ गावात ५२ शेतकऱ्यांचे ४२.५० हेक्‍टर क्षेत्रात केळी पिकाचे नुकसान झाले आहे. सर्व नुकसान ३३ टक्क्यांवरील नुकसान आहे. महसूल व कृषी विभागाचे संयुक्त पथक नुकसानग्रस्त भागात पंचनाम्यांसाठी युद्धपातळीवर कार्यरत झाले आहे.

दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी गुरूवारी तालुक्यात नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा केला. या वेळी त्यांच्या समवेत तहसीलदार महेश पवार, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे, कृषिमंडळ अधिकारी अजय खैरनार, भाजपचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, कृषिभूषण नारायण चौधरी, माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, माजी जिल्हापरिषद सदस्य सविता भालेराव, हर्षल पाटील, भरत महाजन, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत आदी उपस्थित होते. खासदार रक्षा खडसे यांनी महसूलसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे पूर्ण करण्याचे काम तातडीने करावे, अशा सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी विमा कंपनीला ७२ तासांच्या आत कळविणे विषयीचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT