households Sakal
जळगाव

जळगाव : साडेचार हजार घरकुलांची १६ कोटींची थकबाकी

जळगावातील स्थिती; कर्मचारीअभावी वसुली अशक्य

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरात लाभार्थी वापरत असलेली साडेचार हजारांहून अधिक घरकुले असून या घरकुलांकडे महापालिकेची १६ कोटींवर थकबाकी आहे. घरकुल मालमत्ता कर अधीक्षक कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या अभावी वसुली होऊ शकत नसल्याची माहिती अधीक्षकांनी दिलेल्या माहिती अधिकाराच्या उत्तरातून समोर आली आहे.

जळगाव शहरात शिवाजीनगरसह पिंप्राळा व अन्य भागात तत्कालीन पालिकेच्या वतीने घरकुलांची निर्मिती करण्यात आली आहे. या घरकुलांच्या बाबतीत अनेक वादही निर्माण झालेत. या घरकुलांमध्ये जे लाभार्थी राहतात, त्यांच्या पात्रतेबाबतही आरोप- प्रत्यारोप होत आले आहेत. या घरकुलांना नाममात्र कर लावण्यात आला असला तरी त्याचा भरणाही झालेला नाही, किंवा मनपाकडून त्याची वसुली झालेली नाही.

१६ कोटींची थकबाकी

विविध भागात जवळपास ४ हजार ५४१ घरकुले आहेत. या घरकुलांकडे १५ कोटी ९५ लाख २१ हजार ३५५ रुपयांची थकबाकी आहे. काही घरकुलांकडे २० वर्षे, १५ वर्षे तर काही घरकुलांकडे ३० वर्षांपासूनची थकबाकी आहे.

कर्मचारीच नाहीत...

कर वसुली करण्यात येणाऱ्या अडचणींबाबत घरकुल अधीक्षकांनी कर्मचारीच नसल्याचे कारण दिले आहे. घरकुल अधीक्षक विभागात एकच अधीक्षक असून तेदेखील प्रभारी आहेत, विभागात एकच शिपाई असून तो अल्पदृष्टी व पॅरालिसीस झालेला आहे, अशी माहितीही माहिती अधिकारातून समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांचं वय झालंय, ते आता थकलेत, 'राष्ट्रवादी'ने कोणत्यातरी पक्षासोबत जावे; मंत्री चंद्रकांतदादांचा थेट सल्ला

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

SCROLL FOR NEXT