Gulabrao Patil, eknath shinde & Chandrakant patil
Gulabrao Patil, eknath shinde & Chandrakant patil esakal
जळगाव

Jalgaon : आमदार ‘नाथां’सोबत अन् कार्यकर्ते अनाथ

प्रविण पाटील

सावदा (जि. जळगाव) : शिवसेनेचा (Shiv Sena) ठाण्या वाघ आणि कट्टर शिवसैनिक समजले जाणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) हे देखील शिवसेनेचे ज्येष्ठ आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात दाखल झाल्याने येथील शिवसैनिकांमध्ये गोंधळलेली अवस्था आणि संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. (Confusion among Shiv Sainiks in eknath shinde rebellion Maharashtra politics news)

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील काही आमदारांसह बंड केल्याने शिवसेनेत खळबळ माजली आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, चोपड्याच्या आमदार लता सोनवणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होण्याचा निर्णय घेतल्याने अशा परिस्थितीत आपण नेमका काय निर्णय घ्यावा, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. एकीकडे शिवसेनेतील बहुतांशी आमदार हे शिंदे यांच्या बाजूने गेले आहेत. तर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप कमी आमदार राहिले आहेत.

पण अशा परिस्थितीत आपण नेमकी कोणाची बाजू घ्यावी, असा यक्ष प्रश्न शिवसैनिकांना सतावू लागला आहे. कारण शिवसैनिक म्हटला, की तो बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक समजला जातो. आणि मग त्याची ठाकरे घराण्याशी एकनिष्ठता हा भावनिक विषय येतो. पण आज शिवसेना फुटत असताना एक शिवसैनिक म्हणून अशा अवस्थेत नेमकी काय भूमिका घ्यावी, या संभ्रमावस्थेत ते दिसत आहे. याबाबत काही शिवसैनिकांना बोलते केले असता त्यांनी आपल्या खालील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कार्यकर्ते म्हणतात...
शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आपण कुणाकडे, असा प्रश्न येथील शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी यांना विचारला असता आपण आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आहोत, अशी एका वाक्यातील प्रतिक्रिया त्यांनी दिली तर शिवसेना शहरप्रमुख भरत नेहेते प्रश्न विचारताच गोंधळात पडले. आधी बोलताना ते म्हणाले आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत तर नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, असेही म्हणाले. तर नवीन शिंदे गटाला अजून मान्यता नाही. त्यामुळे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे, त्यासोबत आपण आहोत तर अजूनही काहीही घडू शकते, असे त्यांनी सांगितले.

माजी नगरसेवक यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेसोबत आहोत. कारण खरी शिवसेना कोणती हे अजून ठरायचे आहे. अजून सर्व अधांतरी आहे, असे सांगितले. शिवसेनेचे शहर संघटक नीलेश खाचने म्हणाले निष्ठावंत शिवसैनिक स्वाभिमाने जगतो. पदासाठी, पैशासाठी कोणाची कधीच हुजरेगिरी करत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकत त्यांच्या मनगटात आहे म्हणून तो कधीच कुणाला घाबरत नाही. आणि जय बाळासाहेब असे सांगत थांबा आणि वाट पहा या वाक्यात उत्तर दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT