farm pond esakal
जळगाव

वाघूर धरणाच्या लाभ क्षेत्रात 2020 शेततळ्यांची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : वाघूर प्रकल्पाच्या सातव्या सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालानुसार जामनेर तालुक्यातील वाघूर प्रकल्पाच्या २९ गावांतील लाभक्षेत्रामध्ये, जलसंपदा विभाग व कृषी विभागातर्फे एकूण २०२० शेततळे (Farm ponds) बांधणे प्रस्तावित आहेत. शेततळे तयार करणे व शेततळ्यातून सुक्ष्म सिंचन पाणी (micro-irrigation water) वापराबाबत शेतकऱ्यांसोबत करार करण्याची कार्यवाही प्रगतीत असून असा प्रकल्प राज्यात पहिल्यांदा राबविला जात असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १) झालेल्या बैठकीत दिली. (Construction of 2020 farm ponds in benefit area of ​​Waghur Dam jalgaon news)

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली वाघूर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात जलसंपदा विभाग व कृषी विभागाची शेततळे उभारण्याबाबत बैठक झाली. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता य. का. भदाणे, कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, वाघूर प्रकल्पाचे अभियंता विनोद पाटील आदी उपस्थित होते. भविष्यात पाण्याचा काटकसरीचा वापर होण्यासाठी सदर भागात सुक्ष्म सिंचनाला चालना देण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी १० हजार १०० हेक्टरवर राज्यात प्रथमच प्रयोगिक तत्वावर शेततळे उभारण्याचे नियोजन आहे. साधारण ५ हेक्टर क्षेत्रात १ शेततळे (१६ गुंठे आकराचे) त्यामध्ये २७ लाख लिटर पाणीसाठा व तो दर २५ दिवसांनी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे शेततळे भरुन देण्याचे नियोजन राहणार आहे, असे अधीक्षक अभियंता भदाणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावणार

ही कामे चालू वर्षात सुरु करण्याचे नियोजन आहे. शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवे त्यावेळी पाणी मिळणार आहे. त्यामुळे शेती उत्पादन वाढीस मदत होईल. शेततळ्यामध्ये मत्सउत्पादन शेततळ्याच्या बांधावर फलवृक्ष लागवड व सौर ऊर्जा निर्मिती अशा विविध बांबीचा अंतर्भाव करुन शेतकऱ्यांची आर्थीक स्थिती उंचावण्यासाठी मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT