Health sub-centre under construction. esakal
जळगाव

Jalgaon News : करगाव उपकेंद्राचे बांधकाम रखडले; नागरिकांचा आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर!

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील करगावसह चार गावे मिळून आरोग्य उपकेंद्र उभारले जात आहे. मात्र सात वर्षे उलटून देखील बांधकाम अपूर्णावस्थेत असल्याने गावातील गर्भवती महिलांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे बांधकाम तातडीने पूर्ण करून आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. (Construction of Kargaon sub centre stalled issue of citizens health Jalgaon News)

जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत तालुक्यातील करगावला चार गावांना मिळून आरोग्य उपकेंद्रासाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या चार गावांची लोकसंख्या जवळपास ७ हजार इतकी असून, गेल्या सात वर्षांपासून आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम सुरू आहे. मात्र, ते अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे सध्या गावात आरोग्याची सोयीसुविधा नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

त्यात एखाद्याची प्रकृती अचानक खालावल्यास किंवा गर्भवतीला प्रसूतीला घेऊन जायची वेळ आल्यास त्यांना तरवाडे येथील आरोग्य उपकेंद्रात न्यावे लागते. त्यामुळे शासनाच्या पैशांचा अपव्यय झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम होऊन जनतेच्या सेवेत येणे गरजेचे असताना का दिरंगाई होत आहे, याबाबत प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

दरम्यान, हे काम अर्धवट अवस्थेत सोडून दिल्याचे माजी चेअरमन दिनकर राठोड यांचे म्हणणे आहे तर याकडे चाळीसगाव तालुका आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे देखील ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

"आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम गेल्या सात वर्षांपासून रखडले आहे. गावात आरोग्याची दुसरी सुविधा नसल्याने गरोदर मातांसह रूग्णांची गैरसोय होत आहे. किंबहुना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी तरवाडे येथील आरोग्य उपकेंद्राला जावे लागते. त्यामुळे या समस्यांचे तातडीने निराकरण करून रूग्णांची गैरसोय दूर करावी." - दिनकर राठोड, माजी चेअरमन, करगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT