जळगाव

रुग्ण ‘होमक्वारंटाइन’च्या नावाखाली चक्क रस्त्यावर 

सुरेश महाजन,

जामनेर : गेल्या महिनाभरापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यातील काही महाभाग रुग्ण सरकारी दवाखान्यातून औषध, गोळ्या घेऊन गृहविलगिकरण (होमक्वारंटाइन) नावाखाली चक्क रस्त्यांवर, चौकात फिरताना आढळून येत आहेत. या अक्षम्य निष्काळजीपणाचा फटका मात्र इतरांना नकळतच सहन करावा लागत आहे. 


अशाच एका घटनेत मंगळवारी (ता. ९) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तो निर्धास्तपणे गर्दीत हिंडत असताना चांगलेच सुनावले आणि त्याला बरा होईपर्यंत घराबाहेर न पडण्याची सक्त ताकीद दिली. विद्यमान परिस्थितीत दररोज दोन ते पाच रुग्णांची वाढ शहरासह तालुक्यात होताना दिसते. त्या सर्वांना नियमांच्या आधीन राहूनच सरकारी वैद्यकीय अधिकारी आपापल्या घरीच योग्य त्या सूचनांखाली क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, यातील बहुतांश रुग्ण स्वतःचा तर घात करीत आहेतच पण घरातील लहान लहान बालके, वयस्कर लोकांच्याही ते नकळत संपर्कात येतात, अशामुळे हा धोका आहे त्यापेक्षा जास्त वाढू शकतो. याला वरिष्ठ पातळीवरून जाणीवपूर्वक लक्ष घालून कायमस्वरूपी आळा कसा घालता येईल, यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी या घटनेच्या निमित्ताने नागरिकांनी केली आहे. 


कोरोना रुग्णाने स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच इतरांच्याही आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय आपल्याकडे आता सरकारी दवाखान्यासह पळासखेडा येथे रुग्णांची व्यवस्था करण्यात येत आहे. पालिकेनेही सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 
-डॉ. विनय सोनवणे, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT