जळगाव

एरंडोलमध्ये कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर पोलीस, पालिकेची धकड कारवाई

अल्हाद जोशी

एरंडोल ः कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असताना देखील नागरिक प्रशासनाने केलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत आहे.शहरात नगरपालिका व पोलीस प्रशासनाने मास्क न लावणा-यांविरुद्ध कडक कारवाई सुरु केली असून रविवारी नियमांचे पालन न करणा-या नागरिकांविरुद्ध कारवाई करून सुमारे सोळा हजार रुपयांचा दंड वसूल केला.राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नागरिक मास्क न लावता बिनधास्तपणे फिरत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असतांना देखील नागरिक प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत नसल्यामुळे शहरात नगर पालिका कर्मचारी व पोलीस प्रशासन यांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे,हवालदार विलास पाटील,विकास खैरनार,संतोष चौधरी,पालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख विनोद पाटील,एस.आर.ठाकूर,राहुल ठाकूर यांनी  शहरात विनामास्क फिरणा-या नागरिकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे सोळा हजार रुपयांचा दंड वसूल केला.

प्रशासनाकडून आवाहन

पालिकेचे पथक व पोलीस कर्मचारी शहरात होणा-या विवाह समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवून आहेत.नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी किरण देशमुख आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले आहे.शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकानावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

बस स्थानकात प्रचंड गर्दी

दरम्यान प्रशासनाने मास्क लावण्याचे आवाहन केल्यानंतर देखील बस स्थानकावर विनामास्क असणा-या प्रवाशांची संख्या वाढत आहे.तसेच बसमध्ये देखील प्रवाशांची गर्दी वाढत असल्यामुळे कोरोनाची भीती वाढली आहे.नवीन बस स्थानक परिसरात असलेल्या विविध उपाहारगृहांमध्ये व खाद्य पदार्थ विक्री केंद्रावर ग्राहक गटागटाने उभे राहत आहेत.राष्ट्रीय महामार्गावरून जाणारे दुचारीचालक देखील मास्क लावत नाही.पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाने शासकीय नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Crisis : नाशिक विभागात २८२ टँकरवर सहा लाख नागरिकांची भिस्त; अर्धा जुलै संपला, तरी तहान कायम

MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण मध्ये दाखल

Audul voter verification drive : आडूळ केंद्रात मतदार पडताळणीला वेग : १०,८०९ पैकी ३,०५४ फॉर्म ऑनलाइन, २९ जुलैपर्यंत सर्वांनी फॉर्म भरण्याचे आवाहन

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात इंधनटंचाई चालणार नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; पेट्रोल-डिझेल, गॅसपुरवठ्याचा ठोस आराखडा सादर करा

SCROLL FOR NEXT