जळगाव

‘बेजबाबदार’ नागरीक; वीस दिवसांत वाढले पाचपट सक्रिय रुग्ण 

सचिन जोशी

 जळगाव : लग्नसमारंभ, सोहळ्यांनी जमविलेल्या गर्दीतून कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला असून, याआधीच्या लाटेपेक्षाही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांपैकी निम्मे रुग्ण एकट्या जळगाव शहरातील असून, गेल्या २० दिवसांत त्यात पाचपटीने वाढ झालीय. 


रुग्ण वाढू लागल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी गर्दीवर व बाधित रुग्णांवरही महापालिकेचे नियंत्रण नाही, पोलिसांचा वचकही संपल्यात जमा असल्याची स्थिती आहे. 

...अशी उसळली लाट 
ऑक्टोबरपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले, संसर्ग नियंत्रणात येत असल्याची स्थिती असताना जानेवारीच्या शेवटी संसर्ग वाढण्याचे संकेत मिळालेत आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून संसर्गाची तीव्रता जाणवू लागली. 

जळगावात उद्रेक 
जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असताना सर्वाधिक रुग्णवाढ जळगाव शहरात दररोज होत आहे. रोजच्या आकड्यांमध्ये जळगाव शहर आघाडीवर असून, गेल्या तीन-चार दिवसांतच एक हजारावर रुग्ण समोर आले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. 

जनता कर्फ्यूची वेळ 
शहरात गेल्या २१ फेब्रुवारीस ५०३ सक्रिय रुग्ण होते. त्यात २० दिवसांत सातत्याने मोठी वाढ होत गेली. १० मार्चला सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल दोन हजार ३४८ वर पोचली आहे. या भीषण स्थितीमुळे शहरात जनता कर्फ्यू लादण्याची वेळ प्रशासनावर आली. 

बाधित रुग्ण सर्रास रस्त्यावर 
फेब्रुवारीपासून संसर्ग वाढू लागला. मात्र, त्याआधी तीन-चार महिने संसर्ग नियंत्रित असतानाही कुठेही नियमांचे पालन झाले नाही. आता संसर्गाची तीव्रता वाढूनही लोक नियम पाळायला तयार नाहीत. आधीच्या टप्प्यात संशयित रुग्णांनाही संस्थात्मक विलगीकरणात राहण्याची सक्ती होती. गृहविलगीकरणाच्या शिथिलतेने आता बाधित रुग्णही रस्त्यावर फिरत आहेत आणि नेमकी हीच भयंकर चूक आहे. 

ही आहेत कारणे 
- लग्नसोहळे, समारंभांमध्ये झाली गर्दी 
- बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही 
- मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 
- बेजबाबदार नागरिकांची मुजोरी 
- बाधित रुग्ण रस्त्यावर 
- प्रशासनाचा वचकच नाही 
- मनपाचे नियंत्रण, पोलिसांचा धाक नाही 

हे उपाय आवश्‍यक 
- जनता कर्फ्यूचे तंतोतंत पालन 
- जनता कर्फ्यू व्यतिरिक्त उपाययोजना हव्या 
- कर्फ्यूनंतर गर्दीवर हवे नियंत्रण 
- त्यासाठी मनपा, पोलिस यंत्रणा सक्षम हवी 
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे 
- संशयित रुग्णाचे क्वारंटाइन आवश्‍यक 
- बाधित रुग्णांना गृहविलगीकरण नको 
- प्रतिबंधात्मक क्षेत्र अंमलबजावणी कठोर करावी 

संपादन- भूषण श्रीखंडे
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Mayor : कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, पण किती काळ? चंद्रकांतदादांनी केला मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विलीनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय झाला होता : जितेंद्र आव्हाड

Navi Mumbai Mayor: नवी मुंबई सत्तेसाठी भाजप-सेना आमनेसामने! महापौर कोण होणार? निवडणुकीच्या तारखेसह 'या' 2 नेत्यांची नावे समोर

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी का घातला गोंधळ? विरोधी पक्षनेत्याला बोलूच दिलं नाही; कामकाज तहकूब करण्याची वेळ

Viral : चार वर्षांच्या मुलाला शेतात खेळताना सापडला ४०० वर्षांपुर्वीचा खजिना, किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील

SCROLL FOR NEXT