जळगाव

बाजार समिती, रेल्वे, बसमध्ये कोरोना नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई !

देविदास वाणी

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समिती, रेल्वे, बसमध्ये गर्दी करून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, असे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन, रेल्वे विभागास दिले. 

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकारी राऊत यांनी या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे महेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वाय. के. बेंडकुळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाचे प्रतिनिधी ए. के. पाठक, महापालिकेच्या अपर आयुक्त विद्या गायकवाड, डॉ. राम रावलाणी आदी उपस्थित होते. 

रेल्वे, बस, बाजारावर नजर ठेवा

श्री. राऊत म्हणाले, की बाजार समितीमध्ये सकाळी घाऊक खरेदीदाराबरोबरच किरकोळ खरेदीदार गर्दी करतात ती रोखण्यासाठी सहकार विभागाने कडक कारवाई करावी. परिवहन विभागाने विनामास्क प्रवासी आढळल्यास कारवाई करावी. एस. टी. महामंडळाच्या, खासगी बस, रिक्षांमधून जादा प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवासी मास्क न लावता प्रवास करतात. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, रेल्वे विभागाने अमरावती, अकोला, मुंबई, पुणे व नागपूर या जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रवाशांची माहिती उपलब्ध करून द्यावी. रेल्वेगाडीतून प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे की एकाच ठिकाणी गर्दी करून प्रवासी प्रवास करीत आहेत हे तपासावे. 
 

ढाबे, रेस्टॉरंटची तपासणी 
अन्न व औषध विभागाने गर्दी होणाऱ्या उपाहारगृहात तपासणी करावी, गर्दी होणाऱ्या ढाब्यांवर तपासणी करावी. ग्राहकांना समोरासमोर न बसविता एक दिशेने बसवून सोशल डिस्टन्सिंग पाळावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या. 
 

१५ खासगी क्लाससेवर कारवाई 
जळगाव महापालिकेने तपासणी केलेल्या कार्यवाहीची माहिती अपर आयुक्त विद्या गायकवाड यांनी बैठकीत दिली. यात ३७७ विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. १४ मंगल कार्यालये, १५ खासगी क्लासेसवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. डॉ. रावलाणी यांनी आरोग्यविषयक केलेल्या तयारीची माहिती दिली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT