जळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगात ! नव्या २७९ रुग्णांची नोंद 

सचिन जोशी

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगात सुरु असून गुरुवारी आणखी २७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे तीनशेपर्यंत घटलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या आता दोन हजारांच्या टप्प्यात आली आहे. 

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवार व बुधवार असे सलग दोन दिवस तीनशेहून अधिक रुग्ण समोर आल्यानंतर गुरुवारी त्यात अल्प घट आली. गुरुवारी प्राप्त अहवालातून २७९ नवे रुग्ण समोर आले असून एकूण रुग्णसंख्या ५९ हजार ८६४ झाली आहे. अर्थात, बुधवारी २४०० पेक्षा अधिक चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते, त्याची संख्या गुरुवारी १८४६ एवढीच होती. वाढलेल्या रुग्णसंख्येने सक्रिय रुग्णांचा आकडा १९२९वर पोचला आहे. 

बळी पोचले १३८१वर 
गेल्या २४ तासांत जळगाव शहरातील ४६ व ६४ वर्षीय पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींचा आकडा १३८१वर पोचला आहे. तर दिवसभरात १३८ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांची संख्या ५६ हजार ५५४ झाली आहे. 

जळगावात भीषण स्थिती 
जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असताना त्यापैकी जवळपास ७० टक्के रुग्ण एकट्या जळगाव शहरातील आहेत. गुरुवारी जिल्ह्यातील २७९ पैकी जळगाव शहरातील रुग्णसंख्या तब्बल १२३ होती. त्याखालोखाल चाळीसगाव तालुक्यात ४५, चोपडा ३३, मुक्ताईनगर २०, जामनेर १८, पाचोरा १०, जळगाव ग्रामीण ९, भुसावळ ४, यावल ५,भुसावळ ३, अमळनेर २ असे रुग्ण समोर आले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT