जळगाव

सावधान: जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढला 

सचिन जोशी

 जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोकानिर्माण झाला आहे. सोमवारी प्राप्त अहवालांवरुन ही गंभीर बाब समोर आली. सोमवारी अवघ्या तीनशे चाचण्यांच्या अहवालात तब्बल ४७ नवे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. दुसरीकडे जळगाव शहरातही संसर्ग वाढतच असून एकाच दिवसात तब्बल २९ नवे रुग्ण आढळले आहेत. 

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र होते. जानेवारी अखेरपर्यंत हा ट्रेंड कायम होता. नवे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक असे आकडे समोर येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात पुन्हा नव्या रुग्णांची संख्‌या अधिक व बरे होणारे कमी, असे आकडे समोर येऊ लागले आहे. 

तब्बल ४७ नवे रुग्ण 
सोमवारी अवघ्या ३१२ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले, त्यात नवे ४७ रुग्ण समोर आले आहेत. म्हणजे पॉझिटिव्हीटी रेट तब्बल १५ टक्क्यांवर असून ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे. त्यात आरटीपीसीआरच्या ९३ चाचण्यांमधून ३५ व ॲन्टीजेनच्या १७५ चाचण्यांपैकी १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५७ हजार ३५४ वर पोचली. दिवसभरात २८ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५५ हजार ६६५ झाला आहे. गेल्या २४ तासांत भुसावळ तालुक्यातील ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १३६० झाला आहे. 

जळगाव शहरात संसर्ग 
जळगाव शहरात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. आजही तब्बल २९ रुग्ण समोर आले. तर चाळीसगाव तालुक्यात ९, बोदवड २, पाचोरा व भुसावळ तालुक्यात प्रत्येकी २ रुग्ण आढळून आले. भडगाव, चोपडा तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण सापडला. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात तेरावा! उड्डाणपुलाचं काम, त्यात बस-ट्रकचा अपघात; वाहतूक कोंडीत अडकले पुणेकर

Pune Student Attack : पुण्यात धक्कादायक घटना ! क्लास सुरु असताना वर्गमित्रानेच गळा चिरुन विद्यार्थ्याला संपवले; दप्तरात चाकू घेऊन आला अन्...

Stock Market Today : शेअर बाजार लाल! ऑटो सेक्टरला मोठा फटका; Corona Remedies IPO कडे गुंतवणूकदारांचे लक्ष

'...म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अजरामर आहे'; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी महाराजांबद्दल काय सांगितलं?

IND vs SA 3rd T20I: १२,५,१२ धावा करणारा सूर्यकुमार यादव म्हणतो, मी आऊट ऑफ फॉर्म नाही, मी नेट्समध्ये चांगली फलंदाजी करतोय...

SCROLL FOR NEXT