जळगाव

जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६० हजार पार  ​

सचिन जोशी

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख वाढताच असून शुक्रवारीही नव्या रुग्णांचा आकडा तीनशे पार गेला. दिवसभरात ३१८ नवे रुग्ण समोर आल्याने एकूण रुग्णांचा आकडा ६० हजार पार झाला आहे. वाढत्या रुग्णांसोबत सक्रिय, गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. 


जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची दररोजची संख्या वाढत आहे. तीन दिवसांपासून तीनशे पार आकडा समोर येत असून गुरुवारी तो दोनशेच्या आत राहिला. शुक्रवारी पुन्हा ३१८ रुग्ण आढळून आल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६० हजार १८२ झाली. दिवसभरात १३७ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण बरे झालेल्यांचा आकडा ५६ हजार ६८९ वर पोचला. 

सक्रिय रुग्ण दोन हजारांवर 
वाढत्या रुग्णसंख्येसोबत सक्रिय रुग्णांची संख्याही वाढत आहे. दोनच आठवड्यात तीनशेवरुन ॲक्टिव रुग्ण २११० झाले आहेत. तर गंभीर रुग्णही वाढले असून ऑक्सिजनवरील रुग्ण ९८, आयसीयूममध्ये ८६ रुग्ण आहेत. शुक्रवारी चाचण्यांची संख्या वाढून जवळपास २१८७ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. गेल्या २४ तासांत दोन जणांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या १३८३ झाली आहे. 

आवर्जून वाचा- बिबट्याची शेतकऱ्यांमध्ये दहशत;वनकराई शिवारात रात्रीची गस्त 


जळगाव शहरात कहर सुरुच 
जिल्ह्यातील रुग्णसंख्येत जळगाव शहरातील रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. शुक्रवारीही जळगावात १२३ रुग्ण आढळून आले. चोपडा तालुक्यात ३०, चाळीसगाव २४, भुसावळ २४, धरणगाव १६, रावेर १४, मुक्ताईनगर ११, पारोळा ११, जळगाव ग्रामीण ९, अमळनेर ११, जामनेर १९, भडगाव ५, पारोळा ११, एरंडोल २, अन्य जिल्ह्यातील ७ रुग्ण आढळून आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT