जळगाव

जळगाव जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक..तर जणांचा १२ मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा (corona infection) आलेख स्थिर आहे. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार नव्या बाधितांपेक्षा (positive patient) बरे होणाऱ्यांची संख्या अधिक नोंदली गेली. तर दोघा तरुणांसह १२ जणांचा मृत्यू (death) झाला.


(jalgaon district positive patient numbers low corona free patient increased)

जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच आठवडाभरापासून रोजचे मृत्यूही काही प्रमाणात घटले आहेत. गुरुवारी ६ हजार ४५७ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी ७८९ नवे बाधित आढळून आले. एकूण रुग्णसंख्या १ लाख ३३ हजार २१२ झाली आहे. दिवसभरात ८१६ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २० हजार ९७१वर पोचला आहे.

१२ जणांचा बळी
गेल्या २४ तासांत २९ व ३५ वर्षीय तरुणांसह १२ जणांचा बळी गेला. जळगाव शहरातील तिघांचा त्यात समावेश आहे. एकूण बळींचा आकडा २३८६ वर पोचला आहे. सारी, न्युमोनिया, नॉन कोविड, संशयित अशा ९ जणांचा मृत्यू झाला.


असे आढळले रुग्ण
जळगाव शहर १२२, जळगाव ग्रामीण २३, भुसावळ १०६, अमळनेर १६, चोपडा ३७, पाचोरा २९, भडगाव १५, धरणगाव ७, यावल ४१, एरंडोल ११, जामनेर ३०, रावेर ५०, पारोळा २७, चाळीसगाव ८७, मुक्ताईनगर १६१, बोदवड २३, अन्य जिल्ह्यातील ४.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT