coronasuside
coronasuside 
जळगाव

चिंता वाढविणारी बातमी : एकाच दिवसात तिघांचा मृत्यू, नवे २३ बाधित

सचिन जोशी

जळगाव  : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटत असली तरी गेल्या २४ तासांत तिघा रुग्णांच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढीचा दर कमी होत असताना मृत्यूदर मात्र कायम आहे. दरम्यान, गेल्या दिवसभरात २३ नवे बाधित आढळून आले, तर २९ रुग्ण बरे झाले. 

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. मात्र, मृत्यूदर २.३८ टक्क्यांवर कायम आहे. गेल्या २४ तासांत आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात चाळीसगाव, भुसावळ व रावेर तालुक्यातील तिघांचा समावेश असून तिघे ६० वर्षावरील आहेत. आजच्या नव्या २३ रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ६७७ झाली आहे. तर २९ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा ५३ हजार ९४८ झाला आहे. 

आठ तालुक्यांत निरंक 
जिल्ह्यातील अमळनेर, पाचोरा, यावल, रावेर, पारोळा, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड या आठ तालुक्यात आज एकाही रुग्णाची नोंद नाही. तर जळगाव शहरात ५, जळगाव ग्रामीण व भुसावळ तालुक्यात प्रत्येकी ६, चोपडा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

SCROLL FOR NEXT