जळगाव

जामनेर पालीकेची कारवाई; मंगलकार्यालय चालकांमधे भरली धडकी । 

सुरेश महाजन,

जामनेर : कोरोनाचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव पहाता येथील नगरपालीका प्रशासनाकडुन लग्न समारंभात होणाऱ्या गर्दी लक्षात घेवून शहरासह तालुकाभरातील मंगल कार्यालय संचालकांमधे चांगलीच धडकी भरल्याचे दिसते.

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात कोरोनाचे संकट ओढविल्याने प्रशासनातर्फे अनेक निर्बंध लावण्यात आले होते,त्यामुळे जवळपास वर्षभर मंगल कार्यालयाला कुलुप लागल्याचेच दिसत होते, गेल्यावर्षी जेकाही विवाह-सोहळे पार पडले ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच,त्यातही जेवणावळी थोडक्यात आटोपुन घेण्यात आल्या, कोरोना काळातील कठोर नियमावलीच्या अंमलबजावनीमुळे मंडप व्यावसायीकांसह स्वयंपाकी-केटरर्स,बँड-डिजे,घोडे-रोषणाई आदी व्यावसायीकांवर सात-आठ महिने उपासमारी सारखीच परीस्थिती ओढवली होती.

कोरोनाचा संसर्ग पून्हा वाढला

आता पुन्हा यंदाही नुकतीच लग्नसराईला कुठे प्रारंभ झाला-आणी कोरोनाचा प्रादुर्भावाचा मोठा धोका आपले डोके वर काढु लागला,परीणामी प्रशासन सक्रीय होऊन कोरोना प्रतीबंधात्मक नियामांचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन दररोज न थकता त्या-त्या स्तरावरून नागरीकांना करण्यात येत आहे.तरीही उताविळ व उत्साही लोकांनी सरकारच्या या सुचनांकडे साधा मास्क घालण्यासह सर्वच बाबतीत पाठ फिरविल्याचेही अनेकदा समोर येत आहे.

नियमभंगाच्या घटना,20 हजारवर दंड

दोन दिवसांपुर्वी नगरपालीका प्रशासनाच्या वतीने शहर परीसरात धडक मोहीम राबवुन विवाह सोहळ्यामधेच मुख्याधीकारी राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने थेट धडक देऊन 50 च्या वर लोकांची संख्या लग्नाला उपस्थिती असल्याने दोन मंगल कार्यालयातील संबंधितांकडुन सुमारे 20 हजारावरचा आर्थीक दंड वसुल केला,येत्या काळामधील तालुक्यासह शहरातील विवाह सोहळ्यांमधे किती लोक आखुन दिलेल्या नियमांचे पालन करते यावरच मंगल कार्यालय आणी त्यांना चालविणारे काय पवीत्रा घेतात हे पहाणे रंजक ठरणार आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT