corona patients is declining in Jalgaon  sakal
जळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटतेय

नवे १२२ बाधित; दिवसभरात ३३८ रुग्ण बरे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होतोय. दररोजच्या संख्येत घट येत असून, बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने सक्रिय रुग्णसंख्याही कमालीची घटली आहे. शुक्रवारी (ता. ४) नव्या १२२ रुग्णांची नोंद झाली, तर ३३८ रुग्ण दिवसभरात कोरोनामुक्त झाले.

जळगाव जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून वाढलेला कोरोना संसर्ग महिनाभरातच घटू लागला. आता फेब्रुवारीची सुरवात दिलासादायक होऊन बरे होणाऱ्यांची संख्या दररोजच्या नव्या रुग्णांपेक्षा वाढली आहे. आठवडाभरापासून हे प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त १,७८३ चाचण्यांच्या अहवालातून १२२ नवे रुग्ण आढळून आले, तर ३३ रुग्ण बरे झाले. बुधवारी (ता. २) आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची नोंद शुक्रवारच्या अहवालातून समोर आली. सध्या जिल्ह्यात १७६६ सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी केवळ ५० रुग्णांमध्येच लक्षणे आहेत.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ३८, जळगाव ग्रामीण २, भुसावळ ७, अमळनेर ५, चोपडा १६, पाचोरा १८, भडगाव २, एरंडोल ६, पारोळा २, चाळीसगाव २०. शुक्रवारी जिल्ह्यातील धरणगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर व बोदवड या तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

SCROLL FOR NEXT