जळगाव

‘कोविड’च्या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर होणार कारवाई 

देविदास वाणी

जळगाव ः जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णासांठी लागणाऱ्या रेमडिसिवर, टोसीलीझुंबाब, आयटोलीझूंबाब’ अशा इंजेक्शनचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी अशा इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांवर छापे टाकून कारवाईचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. 

जिल्ह्यातील औषधींचे होलसेल डिलर्स/औषध विक्रेते यांच्या वरील औषधांचा पुरवठा प्राधान्याने शासकोय कोविड हॉस्पीटल्स, जिल्हा शल्य चिकित्सकांनी कोविड-19 उपचारासाठी मान्यता दिलेली खाजगी हॉस्पीटल्स, परवानाधारक औषध विक्रेते व शासनमान्य नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायीक यांनाच करावा. शासन मान्य नोंदणीकृत वैद्यकीय परवानधारक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खाजगी व्यक्‍तींना वरील इंजेक्शने उपलब्ध करुन देण्यात येवू नयेत. 

टंचाई होवू न देण्याचे काम औषधे विक्रेत्यांचे

या औषधांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याबाबतची दक्षता होलसेल औषधी डिलर्स / औषध विक्रेते यांनी घ्यावी. वरील बाबींचे पालन होत आहे किंवा नाही याबाबतची खात्री किंवा तपासणी करण्याची जबाबदारी ही औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन यांची राहील. त्यांनी कृत्रीम टंचाई होत असल्याचे आढळल्यास लागलीच कारवाई करावी. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT