Cotton  sakal
जळगाव

खरिपात कपाशी लागवडीत २० टक्के वाढ

कापसाला दहा हजारांचा दर मिळाल्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात यंदा कपाशीची लागवड साडेपाच लाख हेक्टरवर झाली होती. असे असताना अतिवृष्टीने उत्पादनात घट झाली. परिणामतः बाजारात कापूस कमी आल्याने कपाशीचे दर ९ ते १० हजार प्रतिक्विंटल गेले. ही परिस्थिती पाहता आगामी खरीप हंगामात कपाशीच्या लागवडीत २० टक्के वाढ होण्याचा अंदाज कापूस उत्पादक, जिनिंग प्रेसिंग चालकांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात यंदा कपाशी लागवड अधिक होऊनही अतिवृष्टीमुळे कपाशीचे नुकसान अधिक झाले. परिणामतः आतापर्यंत केवळ सात लाख गाठींची निर्मिती जिनिंग प्रेसिंग मिलमध्ये झाली आहे. दरवर्षी १५ ते १८ लाख गाठी निर्मिती केल्या जातात एवढा कापूस जिल्ह्यात उत्पादित होतो. यंदा कापसाची बाजारात आवक नसल्याने अगोदरपासूनच सात हजारांपासून कापसाला दर मिळणे सुरू झाले.

सध्या ९ ते १० हजारांचा दर आहे, असे असताना कापूस उत्पादकांकडे कापूस शिल्लक नसल्याचे चित्र आहे. अनेक जिनिंग मिल्स कापसाअभावी बंद अवस्थेत आहेत. आगामी खरीप हंगामानंतर अशी स्थिती येऊ नये, कापसाला चांगला भाव मिळतो आहे. आणि भविष्यात मिळेल या आशेने बागायतदारासह कोरड वाहू शेतकरी खरीप हंगामात वीस टक्के जादा कापूस पेरण्यावर भर देतील, असे कापूस उत्पादक सांगतात. जळगाव जिल्हा कापूस, केळी आणि सोने यासाठी प्रसिद्ध आहे. कापसाला नगदी सोने म्हटले जाते. शेतात कापूस उत्पादन आले की त्याला क्वालिटीपासून चांगला दर लगेच मिळतो. काही व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन जागेवरच खरेदी करतात यामुळे कापसाला नगदी सोने म्हटले जाते. आगामी खरीप हंगामाला चार महिने उशीर असला तरी कापूस अधिक उत्पादनासाठी, कपाशीला नैसर्गिक आपत्तीपासून वाचविण्यावर शेतकरी नियोजन करीत आहे. जेणे करून उत्पादित कापसाला ९ ते १० हजार एवढा दर मिळेल.

"यंदा कापसाला कधी नव्हे एवढा दर मिळत आहे. मात्र अतिवृष्टीने आमचे मोठे नुकसान झाले आहे. आगामी खरीप हंगामात अधिक पेरा करून आताचा तोटा तेव्हा भरून काढू. त्यासाठी आगामी काळात जादा पेरणीवर भर देण्याचे नियोजन आहे."

- विजय भोळे, शेतकरी, सुनसगाव

"चांगला कापसाला यंदा ९ ते ९५०० असा दर आहे. आगामी खरीप हंगामात तसाच दर राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे शेतकरी किमान वीस ते तीस टक्के अधिक कपाशीचा पेरा करतील, अशी आशा आहे."

- प्रदीप जैन, अध्यक्ष खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT