crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पत्नीचा छळ करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी न्यायालयाने आरोपीस एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

पारोळा जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला.(court sentenced man who tortured his wife jalgaon crime news)

आरोपी बाबुलाल सुकलाल चव्हाण (रा. कापडणे, ता. जि. धुळे) याचा छायाबाई चव्हाण यांच्याशी सुमारे १६ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्याच्या दीड महिन्यानंतर बाबुला चव्हाण याने तिला त्रास देणे सुरू केले. दरम्यान, २२ जून २०१७ पर्यंत आरोपी बाबुलाल सुकलाल चव्हाण याने पत्नी छायाबाई (मृत फिर्यादी) हिने माहेरून ५० हजार रुपये आणावे, यासाठी पत्नीचा वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ केला.

तसेच १२ जून २०१७ ला छायाबाई हिला माहेर असलेले मोंढाळे (ता. पारोळा) येथील घरी पत्नीसह तिच्याआई, वडिलांना शिवीगाळ व मारहाण करून त्यांना दुखापत केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या खटल्यात कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा केल्याचा दोषारोप बाबुलाल सुकलाल चव्हाण याच्यावर ठेवण्यात आला होता.

आरोपी बाबुलाल चव्हाण याच्यावर न्यायालयात भादंवि कलम ४९८ अ प्रमाणे गुन्हा सिद्ध झाल्याने गुरुवारी (ता. १४) न्यायाधीश एम. एस. काझी यांनी आरोपी बाबुलाल सुकलाल चव्हाण (रा. कापडणे, ता. जि. धुळे) याला एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व रक्कम रुपये एक हजार दंड, दंड न भरल्यास दहा दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

या प्रकरणात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियाेक्ता पी. बी. मगर यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्याचा तपास पारोळा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी बाळकृष्ण हरीचंद्र शिंदे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT