dhule sakal
जळगाव

धुळे : कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड ओतली बेसिनमध्ये!

महापालिकेतील संतापजनक प्रकार; शासनाकडून स्वतंत्र चौकशीची गरज; दोषींच्या मुसक्या आवळा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : संसर्गजन्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक निष्पापांचा बळी गेला. काही पोरकी, निराधार झाली, तर काहींचे वडील, आई, पती असे कुणीतरी दगावले. या स्थितीत जीव वाचविण्याच्या धडपडीत देशात सर्वत्रच कोरोना प्रतिबंधात्मक कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड लस घेण्यासाठी अक्षरशः रांगा लागत होत्या. मात्र, या विपरीत धुळे महापालिकेत संतापजनक प्रकार घडत होता. डोस न देता आर्थिक फायद्यासाठी बनावट लसीकरण प्रमाणपत्र वितरित करताना हे पाप झाकण्यासाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड लस अक्षरशः बेसिनमध्ये ओतली जात होती. शहर पोलिसांच्या चौकशीत काही संशयितांनी ही कबुली दिली आहे.

महापालिकेने बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा दडपण्याच्या नादात शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. इतकेच नव्हे, तर आर्थिक फायद्यासाठी यूझर आयडी व पासवर्डची चोरी करून तीन हजार १९१ व्यक्तींना बनावट लसीकरण प्रमाणपत्र दिले, अशी फिर्याद प्रशासनाने दिली आहे. हा सर्व गंभीर प्रकार १४ ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

एक क्षण ही स्थिती खरी असल्याचे मानले तर कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन लशीचा वापर न करता बनावट प्रमाणपत्र जनरेट करून वितरित झाले. मग जितके प्रमाणपत्र वाटप झाले त्यातील लशीच्या बाटल्यांचे काय झाले हा प्रश्‍न अनुत्तरितच होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने प्रथम चार संशयितांना अटक केली. त्या वेळी काही संशयितांनी कबुलीत कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड लस बेसिनमध्ये ओतली आणि पुरावा नष्ट केल्याची धक्कादायक माहिती दिली. हा अत्यंत गंभीर व निषेधार्ह, संतापजनक प्रकार घडला आहे. एकीकडे आबालवृद्ध लस घेण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री अधिकाधिक साठा मिळवून नागरिकांच्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी धडपडत होते, तेव्हा येथील महापालिकेत बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा घडत असताना, कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड लस अक्षरशः बेसिनमध्ये ओतून वाया घालविली जात होती.

चौकशीतून मुसक्या आवळा

या प्रकरणी राज्य शासनाने स्वतंत्र चौकशी समिती नेमावी आणि लशीच्या बाटल्यांचा हिशेब घेत दोषींच्या मुसक्या आवळाव्यात. शहर पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनीही हा जनहिताचा महत्त्वाचा मुद्दा फेरचौकशीत घ्यावा आणि जिल्हा न्यायालयास अवगत करून देत दोषींच्या मुसक्या आवळाव्यात. हे निषेधार्ह प्रकरण तडीस नेण्यासाठी संबंधित नर्स, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यापैकी कुणाचीही गय न करता त्यांना तातडीने ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी जनमानसातून होताना दिसते. महापालिकेत लशीच्या नेमक्या किती बाटल्या बेसिनमध्ये ओतल्या, त्यात कोण-कोण सहभागी होते, लस बेनिसमध्ये ओतताना त्यांच्या संवेदना कुठे हरपल्या होत्या, आर्थिक घोटाळ्याचे पाप लपविण्यासाठी जनतेच्या रक्षणाचे कर्तव्य पार पाडण्याऐवजी लस बेसिनमध्ये ओतण्याचे धाडस का झाले, या सर्व बाबींची राज्य शासनासह पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कायदेशीर लढाईत अवगत केले का?

बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड लस वाया घालविण्यात आली व बेसिनमध्ये ओतण्यात आली. याद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या लसीकरण कार्यक्रमाला येथे गैरप्रकारातून खो घालण्यात आला. त्या वेळी अटकेतील संशयितांनी पोलिस चौकशीत ही माहिती दिल्यावर ती कामकाजावेळी कायदेशीर लढाईत अवगत करून देण्यात आली का यांसह विविध प्रश्‍न धुळेकरांच्या मनात घर करून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT