Gold Jewelry esakal
जळगाव

जळगाव : ‘गोल्डनमॅन’ बनण्याची वाढली ‘क्रेझ’

देवीदास वाणी

जळगाव : पूर्वी सोन्याचे दागिने (Gold Jewelry) घालण्याची मक्तेदारी महिलांची होती. लग्न समारंभात गेले तर महिलांची श्रीमंती तिने घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर ओळखली जात असे. आताही तसेच आहे. मात्र दागिने घालून मिरविणे ही आता महिलांची मक्तेदारी राहिली नाही. पुरुषांमध्येही दागिने घालण्याची क्रेझ आता झपाट्याने वाढू लागली आहे. सोनसाखळी (जाड साखळी) दिसावी म्हणून खास शर्टची वरील बटन उघडी ठेवली जाते. मनगटावरील पिवळे धम्मक ‘ब्रेसलेट‘ असो की हाताच्या दहाही बोटातील अंगठ्या... ‘श्रीमंती’ दाखविण्याचा व समोरच्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यासाठी युवावर्ग गोल्डनमॅन (Gold man) बनत आहे. (Craze to become Goldenman growing Jalgaon news)

यात मुख्यतः राजकारणी, कंत्राटदार, जमिनदार, धनाढ्य शेतकऱ्यांसह काहींना दागिने घालण्याची आवड असल्याचे दिसून येत आहे. संगीतकार, गायक बप्पी लहरी यांना सोन्याचे दागिने घालण्याची हौस होती. यामुळे त्यांना गोल्डनमॅन म्हणून ओळखले जायचे, पुण्याचे माजी आमदार रमेश वांजळे हे गोल्डनमॅन म्हणून प्रसिद्ध होते. जळगाव शहरातील अनेक राजकीय युवकांमध्ये सोन्याची साखळी, ब्रेसलेट, अंगठ्या घालण्याची क्रेझ आहे. अनेक वाळू व्यावसायिकही सोन्याचे दागिने घालून आपली हौस पुरविताना दिसतात.

हे आवडते पुरुषांना...

* सोन्याचा चष्मा, घड्याळ - आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसावे यासाठी सोन्याची फ्रेम असलेला चष्मा तयार करवून घेण्याकडे युवकांचा कल आहे.

* ब्रेसलेट - हातात पूर्वी स्टील किंवा तांब्याचे कडे घालण्याची क्रेझ होती. मात्र आता त्याची जागा सोन्याच्या ब्रेसलेटने घेतली आहे. ब्रेसलेट आता अनेक डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. लग्न कार्य, विविध प्रकारचे कार्यक्रमात ब्रेसलेट हौसेने घातले जाते.

* साखळी - पुरुषांना गळ्यातील साखळी जास्त आवडते. त्यात जाड साखळी विशेष पसंत केल्या जात आहेत. ५ तोळे ते पंधरा तोळ्यांपर्यंतची सोन्याची साखळी घातली जाते.

* अंगठी - बोटात अंगठी घालणे ही पूर्वीपासून पुरूषवर्ग पसंत करीत आहे. विशेषतः राशीनुसार खड्यांची अंगठी जास्त परिधान केली जाते. सोन्यात किंवा चांदीत या अंगठ्या असतात. मात्र आता सोन्यामध्ये विविध डिझाइनच्या अंगठ्या आल्या आहेत.

"ब्रेसलेट, सोनसाखळी चेन, अंगठी, करदोडा, सोन्याचा चष्मा, सोन्याचे घड्याळ बनवून घालण्याचे फॅड वाढले आहे. आपल्या क्रयशक्तीमाणे शंभर ग्रॅमपासून एक किलोपर्यंत वजनाची ही दागिने असतात. युवा वर्ग याला अधिक पसंती देतो."

- मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT