अमळनेर (जि. जळगाव) : अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने प्रेमसबंध ठेवून तिच्यावर अत्याचार करून तिला धमकी दिल्याप्रकरणी शहरातील गांधलीपुरा भागातील मेहतर कॉलनीतील दोघांविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
गांधलीपुरा येथील साडेसतरा वर्षीय मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी घरी असताना, मेहतर कॉलनीतील कुणाल ऊर्फ अण्णा देवा घोगले याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तीन ते चार वेळा घरासमोरील पडक्या घरात अत्याचार केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास, वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. अत्याचार करताना लक्ष ठेवण्यासाठी अण्णा घोगले हा त्याचा चुलतभाऊ रवी ऊर्फ रघूभाई घोगले याला घराबाहेर ठेवायचा. मुलीने त्याला लग्न ठरल्याचे सांगितल्यानंतर त्याने तिच्याकडून बळजबरीने शाळा सोडल्याचा दाखला घेतला व वारंवार मागूनही तो दिला नाही. मुलीला लग्न कर, म्हणून तो सातत्याने धमकी द्यायचा. या तक्रारीवरून दोघा संशयितांविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे तपास करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.