crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलावर अत्याचार; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलास दारू पाजून त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसूल करणाऱ्या महिलेसह चौघांविरुद्ध पाचोरा पोलिसांत शनिवारी (ता. २) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील एका मोठ्या गावातील या प्रकारामुळे समाजमन सुन्न व संतप्त झाले आहे.(Crime against four persons including woman for molesting minor child jalgaon crime news)

कोरोना लॉकडाउनच्या काळात आपल्या परिवारासह तालुक्यातील आपल्या मूळ गावी आलेल्या अल्पवयीन मुलाच्या मित्राच्या नात्यात असलेल्या महिलेने अल्पवयीन मुलास दारू पाजून बळजबरीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले.

त्याचा व्हिडिओ तयार केला. पन्नास हजार रुपये आणून दे, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मुलाने घाबरून जाऊन घरातील पैसे व दागिने या महिलेला आणून दिले; परंतु पुन्हा तशीच मागणी दोन वेळा झाल्याने मुलाने झालेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.

त्यांनी संबंधित महिलेस जाब विचारला असता त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. त्यामुळे पीडित मुलाच्या पालकांनी पाचोरा पोलिसांत तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी महिलेसह चौघांविरुद्ध शनिवारी (ता. २) गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक योगेश गणगे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Rinku Singh : देशासाठी रिंकू सिंग परतणार! वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर तो कोलकात्यात संघात दाखल होणार, वेस्ट इंडिजला भिडणार...

SCROLL FOR NEXT