A crime branch team seized 500 kg of ganja
A crime branch team seized 500 kg of ganja  esakal
जळगाव

Jalgaon News : ओडिशाच्या गांजाची महाराष्ट्राला ‘धुंद’... तस्कराला अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : देशाच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकाला अर्थात ओडिशा ते मुंबई असा तब्बल दीड हजार किलोमीटरचा प्रवास करुन महाराष्ट्रात उच्च प्रतीचा गांजा पुरविला जातो.

अशाच ७५ लाखांच्या गांजाची ‘कन्साईनमेंट’ घेऊन निघालेला ट्रक (Truck) येथील गुन्हे शाखेने पकडला. (crime branch caught truck carrying consignment of ganja worth 75 lakhs jalgaon crime news)

चालक जेल भोगायला तयार.. मात्र, नाव सांगेना. पोलिसांनीही शक्कल लढवून थेट लाचेची मागणी केली. कती देतो बोल? चालकाने मूळ मालकाशी बोलणं करवून दिलं.. पैसे घेऊन मालक चक्क विमानाने धडकला.. मात्र, त्याच्या हातात कायद्याच्या बेड्या पडल्या.

देशात ओडिशाच्या गांजाचा दर्जा एक नंबरचा असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे सर्वाधिक मागणी असते. तस्करांसाठी महाराष्ट्र मोठी बाजारपेठ असून ओडिशातून देशभरात गांजाची तस्करी करण्यात येते.

ओडीशाच्या गांजाची तऱ्हाच न्यारी आहे. कुरिअर पार्सलप्रमाणे गांजा हवा बंद पॅक करुन तो थेट ट्रकमध्ये लोड होतो. वाहतूक करणाऱ्या चालकाला खास बक्षीस दिले जात असल्याने चालकही कुठेच न थांबता सलग ३६ तासांचा अखंड प्रवास करत इच्छितस्थळी पोचवितो.

अर्थात, सलग चालणारा कायमचा चालक असला तरच त्याला ही जबाबदारी दिली जाते. अन्यथा प्रत्येक पाचशे मीटरवर नवा चालक नियुक्त करुन माल मुंबईत आणला जातो.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

गुन्हेशाखेच्या हाती लागला

ओडीसातून जळगाव मार्गे ७५ लाखांच्या गांजाची खेप घेऊन शुक्रवारी (ता.१०) ट्रक (एमएच १५ एएच ६९९४) जळगावमार्गे जात होता. मात्र, भुसावळ येथे ट्रक नादुरुस्त होऊन पडला.

चालकाच्या वेळेची खोटी होत असल्याने त्याची चलबिचल वाढली. भुसावळमधील काही गांजा तस्करीच्या व्यवसायात असलेल्या काहींची नजर या ट्रकवर पडली.

तत्काळ त्यांनी गुन्हेशाखेला टिप दिली. निरीक्षक किशन नजन पाटील त्यांच्या पथकासह ट्रकजवळ धडकले. पोलिस पथक पाहून बोबडी वळलेल्या चालकाची चौकशी करून ट्रकची झडती घेताना संशय बळावला अन्‌ ट्रकमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त चक्क ७५ लाख रुपयांचा ५०० किलो गांजा गुन्हेशाखेच्या हाती लागला.

ट्रकचालकावर सापळा

ट्रकचालक प्रकाश सुनील कासोटे (रा. झोडगे, ता. मालेगाव) याला अटक करण्यात आली. चौकशीत मूळ मालकाबाबत आढेवेढे घेत असलेल्या चालकावर निरीक्षक नजन पाटील यांनी एकट्यात घेत ‘तोडपानी’ करून ट्रक सोडून देण्याची खात्री पटवून दिली.

त्याच्याशी मैत्रीपूर्ण वागणूक दिल्यावर प्रकाश कासोटे याने त्याच्या मोबाईलवरून गांजाचा मूळ मालक व ओडिशातील मुख्य तस्कराशी बोलणे करवून दिले. कासोटे यालाही मोठं-मोठं वाटलं.. नेहमीच्या मार्गात जर आपला हप्ता ठरला तर..

कशाचीच भिती राहणार नाही आणि पोलिसच आपल्या खिश्यात म्हटल्यावर मालकही खुश अशा तोऱ्यात वावरणाऱ्या चालकाने मालकाला खात्री पटवून देत रोख रकमेबाबत बोलणे करवून देण्यासाठी बोलावून घेतले. मालकही तयार झाला.

ओडिशातून उडत आला अन्‌ अडकला..

महाराष्ट्रात गांजा सप्लाय करणारा मुख्य स्मग्लर सीबाराम दया बसवाल (रा. फासीगुडा, ओडिशा) हा थेट मुंबईपर्यंत येण्यासाठी विमानात बसल्याची खात्री झाल्यावर गुन्हेशाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांनी ७५ लाखांच्या गांजासह ट्रक व चालकाला ताब्यात घेतले.

मुंबईत उतरल्यावर त्याने कोणत्या रेल्वेत बसावे, इथवर पोलिस मार्गदर्शन करत होते. तसाच तो मनमाड व नंतर मालेगावात धडकला.

त्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या गुन्हेशाखेच्या पथकाने अलगद त्याला ताब्यात घेतले. हप्त्याच्या बोलणीसाठी आलेल्या सीबाराम बसवाल याला अटक करुन ट्रकचा मालक सतीश लक्ष्मण वाघ (रा. आडगाव, नाशिक) याचा ठिकाणा लागला.

त्याच्या अटकेसाठी गुन्हे पथक नाशकात मुक्कामी आहे. अटकेत असलेले ट्रकमालक सतीश वाघ, मुख्य पुरवठादार सीबाराम दया बसवाल व ट्रकचालक प्रकाश सुनील कासोटे (रा. झोडगे, मालेगाव) या तिघांना आज भुसावळ न्यायालयात हजर केल्यावर त्यांची पोलिस कोठडीत रवानी करण्यात आली. उपनिरीक्षक गणेश चोभे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT