जळगाव

देवझिरी वनक्षेत्रात सागवान तस्करांनी वन विभागाच्या पथकावर केला हल्ला !

रोहिदास मोरे

अडावद: सातपुड्यातील देवझिरी वनक्षेत्रात उभ्या झाडांची कत्तल करण्यास मज्जाव करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली. यात आठ कर्मचारी जखमी झाले. जमाव पांगविण्यासाठी हवेत बंदुकीतून दोन फैरी झाडल्या. याबाबत ३० ते ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 


देवझिरी वनक्षेत्रात सागवान तस्कर सायंकाळी लाकडे तोडत होते. यावेळी वन विभागाचे पथक येवून त्यांनी लागडे तोडण्यास मज्जाव केला, म्हणून रवींद्र बारेला व भागड्या भिलाला (रा. मोहनपुरा, ता. वरला, जि. बडवाणी) यांना वनकर्मचाऱ्यांनी जंगलात पळविले. तसेच ३० ते ३५ अनोळखी व्यक्तींनी वनकर्मचाऱ्यांवर गोफणीने दगडफेक केली.

वन विभागाने केली फायरिंग

यामुळे एसआरपीएफ जवान, वन विभागाचे कर्मचारी व रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांना दुखापत केली. शेख आसिफ शेख अकबर यांच्यावर कुऱ्हाड वार केला. वनकर्मचाऱ्यांनी जमावाला पांगविण्यासाठी बंदुकीतून दोन फैरी केल्या. याबाबत वनक्षेत्रपाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलिस ठाण्यात अज्ञात ३० ते ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT