जळगाव

आधी पायी चालून केली खात्री, मग टाकली धाड आणि जप्त केली विदेशी दारूचा साठा 

दिपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः बहाळ (ता. चाळीसगाव) शिवारातील एका हॉटेलच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या विदेशी दारू व बिअरची विक्री करणाऱ्याला मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी पकडले. त्याच्याकडून ६४ हजारांची विदेशी दारू व बिअर जप्त केली. याप्रकरणी एकास अटक केली असून, त्याच्या विरोधात मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

याबाबत माहिती अशी, की मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांना बहाळ ते चाळीसगाव रस्त्यावरील बहाळ शिवारातील हॉटेल गिरणा पार्कच्या बाजूला विनापरवाना विदेशी दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक हेमंत शिंदे, हवालदार मिलिंद शिंदे, अरुण पाटील, जालमसिंग पाटील, प्रतापसिंग मथुरे, गोरख चकोर, हनमंत वाघोरे, सिद्धांत शिसादे यांच्या पथकाने गुरुवारी (ता. २५) रात्री सव्वाआठच्या सुमारास छापा टाकला असता, सुनील देसले (वय ३२, रा. सावदे, ता. भडगाव) हा दारू विकताना आढळला. त्याच्याजवळ एकूण ६४ हजार १९० रुपये किमतीच्या ३७७ विदेशी दारूच्या व बिअरच्या बाटल्या जप्त केल्या. 

पायी चालत जाऊन केली खात्री 
ज्या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली, त्यापूर्वी पथकाने खात्री करण्यासाठी पायी जाऊन पाहिले. कारवाईची कुणकूण कोणालाही लागू नये, यासाठी पथकाने आपले वाहन हॉटेलपासून काही अंतरावर उभे केले. रात्रीच्या अंधारात अचानक जाऊन मुद्देमालासह संशयित दारूविक्रेत्याला अटक केली. याप्रकरणी हनुमंत वाघेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुनील देसले (रा. सावदे, ता. भडगाव) याच्या विरोधात मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल आहे. 

परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर पोलिसांना तातडीने कळवावे, जेणेकरून कारवाई करता येईल. याकामी ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे. प्रत्येक गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यांवर कारवाया सुरूच राहतील. 
-पवन देसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)  

 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Oppo Reno 14 Launch : एकच झलक, सबसे अलग! लाँच झाली Oppo Reno 14 सिरीज; 50MP कॅमेरे, 1TB स्टोरेजसह AI फिचर्स अन् किंमत फक्त..

Athani Road Accident : शाळेला जाणाऱ्या दहा वर्षांच्या मुलाला कारने उडविले; अगश्य जागीच ठार, घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश

Crime News: हातगाडीला धडक दिल्याने युवकाला बेदम मारुन ठार केलं; शहरात जातीय तणाव

Imtiaz Jaleel : पोलिसांची नोटीस स्वीकारण्यास इम्तियाज जलील यांचा नकार

SCROLL FOR NEXT