जळगाव

मविप्र’ प्रकरणी गुन्ह्यात महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत; कोथरूड पोलिस जळगावमध्ये मुक्कामी 

सचिन जोशी

जळगाव : मराठा विद्याप्रसारक मंडळ या संस्थेच्या ताब्यावरून माजी मंत्री गिरीश महाजन व अन्य २८ जणांवर दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी विद्यापीठासह विविध विभागांकडून आवश्यक माहिती संकलित केली आहे. काही विभागांकडून अद्यापही माहिती न मिळाल्याने पथकाचा जळगावातच मुक्काम आहे. 


संस्थेचे संचालक अ‍ॅड. विजय पाटील यांच्या तक्रारीनुसार माजी मंत्री महाजन यांच्यासह २९ जणांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात मविप्र संस्थेसंदर्भातील गुन्ह्यांसह इतर माहिती घेण्यासाठी कोथरूड पोलिस ठाण्याचे पथक याआधी गेल्या महिन्यात २२ जानेवारीस जळगावात आले होते. 

माहितीचे संकलन 
जळगावमध्ये मुक्कामी असलेल्या पथकाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, धर्मादाय आयुक्त कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, सहशिक्षण संचालक, जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह विविध बँकांना पत्र दिले होते. पत्रानुसार माहिती संकलित करण्यासाठी दोन दिवसांपासून कोथरूड पोलिसांचे पथक जळगावात आहे. शुक्रवारी दिवसभरात विद्यापीठ, धर्मादाय आयुक्त, तहसील कार्यालय, नवी पेठेतील अकोला जनता बँक, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडून गुन्ह्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे व माहिती संकलित करण्यात आली. 

कागदपत्रांची जंत्री जमा 
य माहिती संकलनात माध्यमिक शिक्षण विभागाकडून दहा हजार पानांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र, पथकाने आवश्यक तेवढीच माहिती प्राप्त करुन घेतली. काही विभागांनी दिलेल्या पत्रानुसार काही माहिती अद्यापही दिलेली नाही. त्यामुळे माहिती न देणारे विभाग तसेच कार्यालयेही आता कोथरुड पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगितले.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer News : तुकाराम मुंढे यांची बदली होणार?, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विधानसभेत दिली माहिती

Mumbai Crime: कुर्ल्यात धक्कादायक घटना! कोयत्याचा धाक दाखवत १० वर्षांच्या मुलासमोर विवाहितेवर अत्याचार, आरोपीला अटक

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Tukaram Mundhe: हॉटेलात मोफत अन् स्वच्छ पिण्याचं पाणी बंधनकारक, सुरक्षित अन्नासाठी कठोर नियम; तडजोड नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

SCROLL FOR NEXT