Thief
Thief Thief
जळगाव

आता हद्दच झाली ना राव..कोरोना रुग्णाचे बेडवरून पैसे चोरले !

भूषण श्रीखंडे

जळगाव ः शहरातील एका खासगी रुग्णालयात (Hospital) कोरोना पॉझेटिव्ह (Corona positive) पती-पत्नी (Husband and wife) उपचार घेत होते. पती आयसीयू (ICU)मध्ये असल्याने पत्नी पतीने जेवण केले की नाही पाहण्यासाठी गेल्या आणि त्यांच्या बेड जवळील पर्समधून पंधरा हजार रुपये चोरीला (Thief) गेल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्‍यात ( Jalgaon city police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(jalgaon private hospital corona patient money thief)

जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील रहिवासी अलका लोणे हया पती मधूकर लोणे व मुलगी युवती पाटील यांच्यासह वास्तव्यास आहेत. ५ मे रोजी पती मधूकर लोणे हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांना उपचारार्थ जळगावातील शाहूनगरामधील एका खासगी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. नंतर ११ मे रोजी अलका यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना देखील मुलगी युवती हिने अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले.

पतीची विचारपुस करायला गेल्या..

मेडिकल बिलाकरीता साडे बारा हजार व जेवणाच्या डब्यासाठी अडीच हजार रूपये युवतीने हिने आईला दिले होते. ते पैसे अलका यांनी पर्समध्ये ठेवले होते. पती मधूकर यांनी जेवण केले की नाही, याची विचारपूस करण्यासाठी अलका या आयसीयू रूममध्ये गेल्या, तेवढयात त्यांच्या पर्समधील पंधरा हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरटयाने चोरून नेली.

पाच मिनीटात बेडवरून रक्कम गायब

पाच ते सहा मिनिटानंतर अलका पून्हा त्या त्यांच्या बेडवर आल्या असता, त्यांना पर्समधील रोकड गायब झालेली दिसून आली. हा प्रकार त्यांनी लागलीच मुलगी युवती हिला सांगितला व डॉक्टरांना सुध्दा घटना कळविली. अखेर युवती राहुल पाटील यांनी गुरूवारी रात्री शहर पोलीस ठाण्‍यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT