जळगाव

दुश्मनी काढण्याठी कंबरेला पिस्तूल, खिशात काडतूस; पण गुन्हा करण्यापूर्वीच गेले कोठडीत

रईस शेख

जळगाव  : शहरात आकाशवाणी चौकात नाश्ताच्या गाडीवर काम करणारा तरुण व त्याच्या मित्राला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पवन ऊर्फ राहुल बनबेरू याच्याकडे काडतूस असल्याच्या माहितीवरून त्याला ताब्यात घेतल्यावर त्याचा मित्र कार्तिक सुरवाडे याला पिस्तूलसह ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील रायसोनीनगरातील पवन ऊर्फ राहुल बनबेरू (वय ३०, रा. रायसोनीनगर) या तरुणाने जिवंत काडतूस खरेदी केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील विजय पाटील, भगवान पाटील, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, सचिन पाटील यांच्या पथकाला मिळाली होती.

अशी केली कारवाई

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी आकाशवाणी चौकातच सापळा रचून पवन ऊर्फ राहुल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात नऊ एमएम जिवंत काडतूस मिळून आले. त्याने पिस्तुलीचा ठिकाणेही सांगितले. परंतू पिस्तूल त्याचा मित्र कार्तिक सुरवाडे (वय १९) याच्याकडे असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला मानराज पार्क येथून ताब्यात घेत झडती घेतली. त्याच्या कंबरेला पिस्तूल आढळून आले. दोघांना अटक करून जिल्‍हापेठ पोलिसांत बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

दुश्मनी काढण्यासाठी मोठा गुन्हा करण्याच्या बेतात
कार्तिक सुरवाडे आणि पवन ऊर्फ राहुल बनबेरू अशा दोघांची घट्ट मैत्री आहे. कार्तिक आकाशवाणी चौकात नाश्ताची गाडी चालवतो. पूर्ववैमनस्यातून दोघेही मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते. दोघांनी पिस्तूल आणि जिवंत काडतूस प्राप्त करून काही तरी होणार यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्यावर झडप घातली.

संपादन- भूषण श्रीखंडे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT