जळगाव

उसनवारीचे पैसे मिळाले; बँकेच्या अकाउंटमध्ये टाकणार तोच पैसे गायब ! 

संजय पाटील

पारोळा : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परिसरातून भरदिवसा मोटारसायकलच्या डिकीतून दोन ज्येष्ठ नागरिकांचे एक लाख ४० हजार रुपये भामट्यांनी लंपास केले. ही घटना  घडली. 

वीज विभागाचे निवृत्त कर्मचारी हिलाल हरी पाटील यांना मित्रास उसनवारीची रक्कम एक लाख परत मिळाल्याने ती आपल्या एसबीआयच्या खात्यात भरू म्हणून त्यांनी मोटारसायकल (एमएच १९, डब्ल्यू १८५) च्या डिकीत रुमालात ठेवून सव्वाबाराच्या सुमारास शाखेत आले. मात्र, प्रचंड गर्दी असल्याने रक्कम पुन्हा डिकीत ठेवून ते परतीच्या मार्गावर निघाले.

डिकीचे कुलूप लावण्यासाठी उतरले

काही अंतर गेल्यावर डिकीचे कुलूप लावून घेऊ म्हणून ते थांबले असता डिकीतून रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आले. या वेळी त्यांनी बँक परिसरात शोध घेतला; परंतु आरोपी व रक्कम मिळून आली नाही, तर दुसऱ्या घटनेत याच दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास शहरातील एकजण ४० हजार रुपये भरणा करण्यासाठी बँकेत आला. मात्र, गर्दीमुळे भरणा नंतर करू, असे ठरवून त्यांनी ४० हजारांची रक्कम पिशवीत ठेवली. ती पिशवी मोटारसायकलच्या डिकीत ठेवून ते परतीच्या मार्गावर निघाले. त्यानंतर बाजारात गेले असता काही घरगुती साहित्य डिकीत ठेवण्यासाठी डिकी बघितली. मात्र, डिकीतून रक्कम असलेली पिशवी लंपास झाली होती. याबाबत त्यांनी तपास केला, पण आरोपी मिळून आला नाही. 

आवश्य वाचा- ‘अंकल रायसोनी ॲन्ड गँग’ला सर्व आरोप अमान्य; राज्यभर ८१ गुन्हे !

सीसीटीव्ही फुटेज मिळाले, पण... 
एकाच दिवशी दोन घटना झाल्याने पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड, कर्मचारी किशोर भोई यांनी दुपारी बारा ते चार असा सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला, परंतु आरोपींनी चलाखी करत हातसफाई केल्याचे दिसून आले. या फुटेजमध्ये काही संशयित लहान मुले दिसून येत असून, याबाबत तपास सुरू आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Kolhapur Wildlife Attack : अवघ्या सव्वा वर्षांच बाळ वडिलांच्या कुशीत शांत झोपलं अन् कोल्ह्याने बरोबर हेरलं; कोल्हापूरच्या चंदगडमध्ये घडलं भयानक

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प

Nagpur Gas Cylinder Price: धुराचे लोट; गॅस टंचाईमुळे गृहिणी पुन्हा चुलीकडे! सरपण गोळा करण्यासाठी महिलांची वणवण

SCROLL FOR NEXT