Bhusawal Crime News Esakal
जळगाव

Bhusawal Crime News: तिहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरलं, एका रात्रीत सख्या भावांसह तिघांचा खून

घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत

सकाळ डिजिटल टीम

भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात पूर्ववैमनस्यातून वखार परिसरातील ग्रामपंचायत शाळेजवळ शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे या दोन भावांचा शुक्रवारी (ता. १) रात्री दहाच्या दरम्यान खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत दोन जण गंभीर जखमी आहेत.

या घटनेबाबत मिळालेली माहितीनुसार, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कंडारी परिसरात शांताराम भोलानाथ साळुंखे व राकेश भोलानाथ साळुंखे या दोन सख्ख्या भावांवर अज्ञातांनी चाकूने व तलवारीने वार केले. या घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर हा प्रकार घडल्यानंतर काही तासाच्या आतच श्रीराम नगर परिसरात कुविख्यात गुन्हेगार निखिल राजपूत याच्यावर अज्ञातांनी वार केले. निखिल राजपूतच्या गळ्यावर वार करत त्याची हत्या करण्यात आली. या तिहेरी हत्याकांडाने भुसावळ शहर हादरलं असून भुसावळ शहर पोलीस व बाजारपेठ पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.

घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे परिविक्षाधिन अधिकारी सतीष कुलकर्णी तसेच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पडघन व कर्मचारी पोहचले असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी सुरू आहे. दरम्यान, या दुहेरी खुनामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पोलिस तपास करीत आहे.

दरम्यान, भुसावळ शहरासह तालुक्यात खून, घरफोड्या यासारखे गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यास पोलिस असमर्थ ठरत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT