crime news Couple attacked by gang Nashirabad 8 injured crime against 36 suspects jalgaon sakal
जळगाव

नशिराबादेत टोळक्याकडून दांपत्यासह कुटुंबावर हल्ला; ८ जखमी, ३६ संशयितांवर गुन्हा

शिराबाद (ता. जळगाव) येथे पतीसह दुचाकीवरून दवाखान्यात जात असलेल्या महिलेला उद्देशून गावातील टवाळखोरांनी शेरेबाजी केल्याची घटना घडली

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नशिराबाद (ता. जळगाव) येथे पतीसह दुचाकीवरून दवाखान्यात जात असलेल्या महिलेला उद्देशून गावातील टवाळखोरांनी शेरेबाजी केल्याची घटना घडली होती. त्याचा जाब विचारल्याने पती-पत्नीसह त्यांच्या कुटुंबावर काठ्या, दगड-विटा, लोखंडी रॉडने हल्ला चढवून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत ८ जखमी झाले असून नशिराबाद पोलिस ठाण्यात ३६ संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. नशिराबाद गावातील रहिवासी साजिद फरीद शाह (वय २४) मंगळवारी (ता. २) त्यांची पत्नी शैनीला बी शाह हिला दुचाकीवरून दवाखान्यात घेऊन जात होते.

यावेळी गावातील शिवाजी चौकामध्ये टवाळखोर शरीफ पिंजारी याने साजिद शाह व त्यांची पत्नी शैनीला यांना उद्देशून आक्षेपार्ह शेरेबाजी केली. कुणाला बोलला असे विचारले असता शरीफ पिंजारी याने साजिद शाह यांच्या कानशिलात लगावली. यानंतर साजिद शाह वडील आणि भावाला सोबत घेत पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असताना यावेळी पुन्हा शरीफ पिंजारी याने साजिद शाह यांच्या वडील व भावाला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी साजिद शाह याचे कुटुंबीय नातेवाईक हे आले असता शरीफ पिंजारी याच्यासह त्यांच्यासोबत ३० ते ३५ जणांनी साजिद शाह यांच्यासह त्यांच्या कुटुंबीय नातेवाइकांना मारहाण केली. या घटनेत साजिद फरीद शाह, जावेद फरीद शाह, फरीद चाँद शाह, आरिफ शरिफ शाह, सलीम नुरा शाह, मुस्कान बी मुस्ताक शाह, रिजवाना बी फजल शाह, सलीम नुरा शाह हे आठ जखमी झाले आहेत.

दंगलीत जखमी

साजिद शाह फरीद शाह, जावेद शाह, फरीद शाह चाँद शाह, आरीफ शाह, सलीम नुरा शाह, मुस्कानबी मुश्ता शाह, रिजवाना शाह अशा जखमींवर उपचार झाल्यानंतर त्याचे जाबजबाब नोंदवण्यात येऊन संशयितांविरुद्ध दंगलीच्या कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून नशिराबाद पोलिसांतर्फे अटकसत्र राबवण्यात येत आहे.

३६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी साजिद शाह यांच्या तक्रारीवरून शरीफ रज्जाक पिंजारी, आरिफ शरीफ पिंजारी, मोहसीन शरीफ पिंजारी, कलीम शरीफ पिंजारी, शोएब शरीफ पिंजारी, शकील रज्जाक पिंजारी, शाकीर शकील पिंजारी, जहिर बिस्मील्ला पिंजार, आसिफ पिंजारी, बशीर पिंजारी, बबलु पिंजारी, जावीद बशीर पिंजारी, आबीद बशीर पिंजारी, आसिफ रशीद पिंजारी, अय्युब निजाम पिंजारी, रईस मुसा पिंजारी, मुसा निजाम पिंजारी, रईस रमजान पिंजारी, आसिफ रमजान पिंजारी, मोहसीन रमजान पिंजारी, इम्रान रमजान पिंजारी, फारुक पिंजारी, गोलू पिंजारी, साबीर पिंजारी, आसीफ पिंजारी, रऊफ पिंजारी, नवाज पिंजारी, मुस्ताक पिंजारी, जावीद पिंजारी, आरीफ रशीद पिंजारी, इक्बाल हारुन पिंजारी, रहेमान रज्जाक पिंजारी, इरफान रहेमान पिंजारी, शरीफ रज्जाक पिंजारी (सर्व रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद) या ३६ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT